सकस, रुचकर आणि आरोग्यवर्धक शेवळ बाजारात दाखल

अमित गवळे
मंगळवार, 22 मे 2018

पावसाळ्यापुर्वीच शेवळ हि रानभाजी जिल्ह्यात काही ठिकाणी दाखल झाली आहे. अतिशय सकस व रुचकर असलेल्या या रानभाजीला सध्या खुप मागणी आहे.

पाली (रायगड) - पावसाळ्यापुर्वीच शेवळ हि रानभाजी जिल्ह्यात काही ठिकाणी दाखल झाली आहे. अतिशय सकस व रुचकर असलेल्या या रानभाजीला सध्या खुप मागणी आहे. अनेक आदिवासींना हि भाजी विकून दोन पैसे हाती मिळत आहेत. काही ठिकाणी मान्सूनपुर्व पर्जन्य पडल्यामुळे डोंगर भागात शेवळ उगवली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात हि भाजी बाजारात दिसत आहे. 

ही भाजी तयार करण्यासाठी बोंडग्याचा पाला देखिल लागतो. कारण या पाल्यामुळे भाजी खवखवत नाही. त्यामुळे आदिवासी महिला शेवळ्या बरोबरच बोंडग्याचा पाला देखील जुडी सोबत ठेवतात. सध्या वीस रुपयांना शेवळ्याची जुडी मिळत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस हा भाव कमी होऊन दहा रुपयांना जुडी मिळेल. तुर्तास तरी खवय्ये उपलब्ध रानभाजीचा आनंद घेत आहेत. सध्या बाजारात लवकरच शेवळ उपलब्ध झाल्याने गृहिणी मात्र आनंदात दिसत आहेत.

Web Title: sheval Vegetable are in market