कुंभार्ली घाट दुरुस्तीसाठी शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा इशारा

Shiv Sena aggressive for repairing Kumbharli Ghat; A warning of agitation
Shiv Sena aggressive for repairing Kumbharli Ghat; A warning of agitation

चिपळूण ( रत्नागिरी) - कुंभार्ली घाट रस्त्याची मागील काही दिवसांपासून आतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे एक ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. यामुळे कुंभार्ली घाट मुत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे पोफळीतील शिवसेना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. बांधकाम विभागाने तातडीने घाटरस्त्याची दुरुस्ती केली नाही, तर 26 जानेवारीला उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे पोफळीतील शाखाप्रमुख मुश्‍ताक सय्यद यांनी दिला. 

ते म्हणाले, कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाट रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या घाटातून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. पावसाळ्यात या रस्त्याची चाळण झाली. पावसाळा संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होते; मात्र बांधकाम विभाग सुस्त असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. घाटात शिरगाव पोलिसांची चौकी आहे. त्या परिसरातही रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. घाटातून उतरताना डाव्या बाजूला आणि रस्त्याच्या कडेचा भाग वाहून गेला असल्याने येणाऱ्या वाहनांना धोका आहे. घाटातून समोरून येणाऱ्या वाहनांना साइड देताना मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. 

सुरक्षित रस्ता कुठेय..? रात्री अपघातांत वाढ 
सोनपात्रा येथील अवघड वळणावरील डांबर वाहून गेल्याने येथे मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा चुकविताना वाहने पलटी होण्याचा धोका अधिक आहे. घाटात सुरक्षित रस्ता शोधताना वाहनचालक आपली दिशा सोडून विरोधी दिशेत जातात. तेव्हा वाहने समोरासमोर येऊन अपघात होतात. रात्रीच्यावेळी अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. 

दृष्टिक्षेपात... 

  • काही ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही भागाकडील साइडपट्ट्या गेल्या वाहून 
  • अंदाजे एक ते दोन फूट खोल पडले खड्डे; मोठ्या अपघाताची शक्‍यता 
  • घटातून समोरून येणाऱ्या वाहनांना साईड देताना संभवतो धोका  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com