पेट्रोल डीझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

पेट्रोल डीझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

सावंतवाडी : वाढत्या पेट्रोल डीझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज सावंतवाडीत सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात आले. यावेळी दरवाढ करणाऱ्या केंद्र शासनाचा धिक्कार असो. खोट्या घोषणा देणाऱ्या शासनाचा धिक्कार असो. अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

यावेळी सावंतवाडी शहराकडे जाणाऱ्या मुख्य मार्ग आंदोलकांकडून रोखण्यात आला होता. दरम्यान उपस्थित पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवली होती. याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले शासनाकडून गेल्या काही दिवसात पेट्रोलची दर गगनाला भिडले जात आहे. सर्वसामान्य लोकांना ते परवडणार नाही. त्यामुळे सर्व पक्ष व लोकांना घेऊन आजही आम्ही आंदोलन केले. शासनाला जाग यावी हा त्यामागचा उद्देश आहे. लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची आमची कधीही तयारी आहे.

यावेळी शब्बीर मणियार, सुधीर पराडकर, जॉनी डिसोझा, मायकल डीसोझा, सुरेश भोगटे, अण्णा केसरकर, शुभांगी सुकी, अपर्णा कोटावळे, अनारोजी लोबो, अफरोज राजगुरू, परिमल नाईक, संदीप खानविलकर, संजय पेडणेकर, विलास जाधव, गुरू वालावलकर, विनोद सावंत, बापू सुभेदार, महेश सुकी, रवी जाधव, अण्णा सावंत आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com