सोशल मिडिया वॉर आता पोलीस स्टेशनात; शिवसेनेची कारवाईची मागणी

सोशल मिडिया वॉर आता पोलीस स्टेशनात; शिवसेनेची कारवाईची मागणी

देवगड : येथील सोशल मिडिया वॉर आता पोलीसांपर्यंत पोचले आहे. सोशल मिडीयावरून पक्षाची नाहक बदनामी करण्यात येत असल्याकडे शिवसेना पदाधिकार्‍यांनी पोलीसांचे लक्ष वेधत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन येथील तालुका शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. (shiv-sena-demand-for-action-against-farmers-kokan-update-marathi-news)

सोशल मिडिशवरून पक्षाबाबत टाकण्यात आलेल्या पोस्टबाबत तालुका शिवसेनेने निवेदन दिले. यावेळी जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शहर प्रमुख संतोष तारी, विभागप्रमुख तुषार पेडणेकर, माजी सभापती रवींद्र जोगल, शिवदास नरे, गणेश गावकर, निवृत्ती तारी, श्रीकांत मल्हार, गणेश जेठे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, 16 जूनला तालुक्यामध्ये सोशल मिडीयाव्दारे देवगड शिवसेना पक्षाचा जाहीर निषेध म्हणून मेसेज करण्यात आला. शिवसेना पक्षाच्या कुठल्याही पदाधिकार्‍यांनी कुठल्याही पक्षाविरुध्द कुठलीही पोस्ट केलेली नसताना विनाकारण शिवसेना पक्षाचा जाहीर निषेध म्हणून सोशल मिडियावर पोस्ट प्रसिध्द करण्यात आली. यातून शिवसेना पक्षाला बदनामी करण्याचा हेतू काय? याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबत सखोल चौकशी करुन संबधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच यापूर्वीही मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवसेना प्रमुख पदाधिकार्‍यांबाबतीतही अपमानास्प्द पोस्ट प्रसिध्द करण्यात आलेल्या होत्या. याकडेही लक्ष वेधून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com