विकासामुळेच कार्यकर्ते शिवसेनेत ः सामंत

 Shiv Sena meeting at Kunkeshwar
Shiv Sena meeting at Kunkeshwar

देवगड (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कुणकेश्‍वर परिसरातील गावातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सांमत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विकासाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम शिवसेना करते. मते मागण्यापेक्षा विकासाने जनतेची मने जिंकत असल्यानेच कार्यकर्ते पक्षात येत असल्याचा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कुणकेश्‍वर येथे केला. विकासाच्या मुद्यावर विरोधकांचा खरपूस आणि मिस्किल समाचार त्यांनी घेतला. 

कुणकेश्‍वर येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी खासदार राऊत, पालकमंत्री सांमत यांच्यासह आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा आघाडीप्रमुख नीलम सावंत -पालव, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, गितेश कडू, सतीश मोतलिंग, शिल्पा मोतलिंग यांच्यासह अन्य उपस्थित होते. कुणकेश्‍वर परिसरातील गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

श्री देव कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय वाळके यांनीही पक्षप्रवेश केला. श्री. सामंत म्हणाले, ""बोलून आक्रमकता दाखवण्यापेक्षा विकासातून शिवसेना आक्रमकता दाखवते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जिंकण्यासह आमदार शिवसेनेचा असेल. भरपाईतून रापण मच्छीमार वंचित राहणार नाहीत. स्थानिक विकासाला निधी देऊ.'' 

श्री. राऊत म्हणाले, ""कुणकेश्‍वरसह आंगणेवाडीला विकास निधी कमी पडू देणार नाही. सीआरझेडमुळे कोणीही बाधित होणार नाही याची काळजी घेऊ. जनतेला विविध शासकीय योजनांचा फायदा करून देऊ. टक्‍केवारीवर जगणाऱ्यांनी ठाकरे कुटुंबावर आगपाखड करू नये असा सल्ला देत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांनाही लक्ष्य केले. विकास कामे आम्ही मंजूर करायची आणि नारळ विरोधकांनी फोडण्याचे षडयंत्र सुरू आहे.'' यावेळी संदेश पारकर यांनी, शिवसेनेचे भगवे वादळ येत असल्याचे सांगुन विरोधकांची दादागिरी खपवून घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी पडते, रावराणे, सावंत आदींनी मनोगत व्यक्‍त केले. 

आणखी काहीजण संपर्कात 
शिवसेनेने टाकलेली रापण कधी ओढायची हे ठरवू. अजूनही काही लोकप्रतिनिधींसह अनेकजण शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांचाही पक्ष प्रवेश होईल, असा विश्‍वास उदय सामंत यांनी व्यक्‍त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com