रत्नागिरीतील भैरीबुवाच्या मंदिरात सापडली शिवकालीन नाणी

रत्नागिरीतील भैरीबुवाच्या मंदिरात सापडली शिवकालीन नाणी

रत्नागिरी - रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहेत. त्या वेळी मंदिराच्या एका खांबाच्या खोबणीत एका पुडीमध्ये शिवकालीन तीन व ब्रिटीशकालीन तीन अशी सहा नाणी सापडली आहेत. मंदिर बांधकामाच्या वेळेला ही नाणी ठेवली असावीत, असा प्राथमिक अंदाज आहे.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी श्री भैरी मंदिराची उभारणी झाली. त्या वेळी बांधकाम करणार्‍या लोकांनी शिवकालीन नाणी या खांबांमध्ये ठेवली असावीत. त्यानंतर या मंदिराचे नूतनीकरण 1833 मध्ये करण्यात आले. त्या वेळीही शिवकालीन व ब्रिटीशकालीन नाणी खांबाच्या खोबणीत ठेवली असावीत. पुन्हा नूतनीकरण करण्यात येत असल्याने ही नाण्यांची पुडी सापडली.

शिवकालीन नाणी तीन आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी म्हणजेच 1664 च्या दरम्यान पहिले चलन (नाणे) प्रसिद्ध केले. या नाण्यावर जी व सी अक्षरे आढळून येतात. यातील एका नाण्यावर जी अक्षर दिसून येते. त्याचे वजन अंदाजे पाऊण तोळा आहे. स्वराज्याचे पहिले नाणे होते, असा इतिहासात संदर्भ आढळतो. दुसर्‍या एका नाण्यावर 5 आकडा आणि तलवार आहे व तिसर्‍या नाण्यावर राजमुद्रा आढळते.

ब्रिटीशकालीन नाण्यांवर क्वार्टर आना व हाफ आना म्हणजे पावकी, निमकी असे लिहिले आहेत. तसेच त्यावर तराजूचे चित्र दिसत आहेत. तसेच दुसर्‍या बाजूला इस्ट इंडिया कंपनी व या कंपनीचे दोन सिंहांचे बोधचिन्ह स्पष्टपणे दिसत आहे. 

श्री भैरी मंदिरातील 1833 मध्ये बांधकाम केलेले जुने खांब, लाकूडसामान याला वाळवी लागली. त्यामुळे दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. काही दिवसांपूर्वी हे काम सुरू झाले आहे. एक फूट बाय एक फूटाचे 6 खांब व वरील सर्व सांगड बदलण्यात येत आहे. यासाठी सुमारे 8 ते 9 लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. भाविकांनी याकरिता सढळहस्ते अर्थसाह्य करावे, असे आवाहन श्री देव भैरी ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com