शिवपुतळ्याचे लोकार्पण फेब्रुवारीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

राजापूर - शहरातील जवाहर चौकामध्ये उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नव्या वर्षामध्ये (फेब्रुवारी) शिवजयंतीचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात येणार आहे. नूतन पुतळ्याचा प्रतिष्ठापना सोहळा यावेळी करण्याचा निर्णय नगराध्यक्षा मीना मालपेकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवस्मारक वास्तू जीर्णोद्धार समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात राजापूरचे स्थान महत्त्वाचे आहे. जवाहर चौकातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. हे काम पालिकेसह पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन आणि अनेक दात्यांच्या सहकार्याने गोळा झालेल्या निधीतून हाती घेण्यात आले आहे. यामध्ये ब्राँझचा शिवपुतळा उभारण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक राजापूरशी संदर्भ लाभलेले भित्तिचित्र, राजमुद्रा, पाली दरवाजा, विद्युतीकरण आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जीर्णोद्धार समितीचे सदस्य तथा वास्तुविद्याविशारद जगदीश पवार-ठोसर यांनी या बैठकीमध्ये दिली. 

फेब्रुवारीतील शिवजयंतीचे औचित्य साधून शिवस्मारकाचे लोकार्पण आणि शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना हे कार्यक्रम निश्‍चित करण्यात आले. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये धार्मिक विधी करून प्रतिष्ठापना करण्यात येईल, अशी माहिती जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष महेश मयेकर आणि कार्याध्यक्ष राजाभाऊ रसाळ यांनी दिली. स्मारक उभारणीसंबंधी तांत्रिक आणि प्रशासकीय विषयांबाबतही चर्चा झाली. 

बैठकीला सचिव उल्हास खडपे, खजिनदार अभय मेळेकर, जयप्रकाश नार्वेकर, महेश शिवलकर, जितेंद्र मालपेकर, अनिल कुडाळी, विजय गुरव, मोहन घुमे, विवेक गुरव, संदीप देशपांडे, धनसिंग चव्हाण, किशोर जाधव, जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Shiva statue unveiled in February