Mahad.jpg
Mahad.jpg

शिवरायांचे गुरु कविंद्र परमानंद यांचे समाधीस्थळ दुर्लक्षीत

महाड : शिवभारत ग्रंथाचे लेखक आणि 'छत्रपती शिवरायां'चे गुरु म्हणून ओळखले जाणारे 'कविंद्र परमानंद' यांचे पोलादपूर येथील समाधी स्थळ सरकार दरबारी दुर्लक्षित राहिले आहे. याच स्थळाजवळ सामाजिक संस्थेने तयार केलेल्या दुर्गसृष्टीचीही वातहात झाली आहे. पोलादपूर बसस्थानका शेजारी असणारे हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यापासून दूर राहिले आहे.

''पोलादपूरमध्ये महामार्गालगत कविंद्र परमानंद यांची समाधी आहे. स्थानिक त्याला परमानंद मठ ''असे म्हणतात. परमानंद हे शिवरायांचे निकटवर्ती मानले जाते. ज्या काही सत्पुरुषांना महाराजांनी गुरु मानले त्यात परमानंद एक होते. त्यांनी लिहिलेले काव्यात्मक शिवभारतात शिवरायांच्या जीवनातील अनेक घटनांचा उल्लेख आढळतो. शिवरायांच्या आग्रा भेटी दरम्यानही परमानंदांना महाराजांचा सहवास लाभला होता.

पोलादपूर येथे 1990 साली समाधी स्थळाची लहान स्वरुपात या ठिकाणी एक इमारत बांधण्यात आली आहे व त्याभोवती कंपाऊड केलेले आहे. हा परिसर तात्कालिन ग्रामपंचायच्या अखत्यारीत असुन ग्रामपंचयतीचा आर्थिक आवाका नसल्याने या स्थळाचा विकास देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही. सध्या समाधीस्थळ व परिसराची दुरवस्था झाली आहे. भिंतीचा पाया खराब होत आला आहे. परिसरही अस्वच्छ आहे. रंगरंगोटी नाही त्यामुळे त्याचा वापर मुले खेळण्यासाठी करतात. दहा वर्षांपूर्वी काही तरुणांनी एकत्र येऊन स्वखर्चाने येथे दुर्गसृष्टी तयार केली. चौदा किल्ल्यांची प्रतिकृती असलेली दगड मातीचे किल्ले तयार करुन परिसराला चांगले स्वरुप आणले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व पर्यटकांनी येथे भेटही दिली परंतु ही चार वर्षांपासून ही दुर्गसृष्टी आता ओस पडलेली आहे. पोलादपूर आता नगरपंचायत झाल्याने त्यांना सरकारकडून निधी मिळत असतो. त्यातून अशा स्थळांचा विकास करता येत नसल्याने नगरपंचायतीने पर्यटन विकासाच्या दृष्टीने याचा विकास केल्यास गोवा व महाबळेश्वरला जाणारे पर्यटक येथे थांबतील व स्थानिकांना रोजगारही मिळेल.

''नगरपंचायतीने या स्थळाचा विकास करण्याबाबत पावले उचलली आहेत. समाधीचा रंगरोगोटी व परिसरात एखादे उद्यान करण्याचा मानस आहे.''  
- नीलेश सुतार ( नगराध्यक्ष,पोलादपूर)

''छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील समकालिन कवी असलेले परमानंद स्वामी मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे समाधीस्थळी उचीत स्मारक शासनाने केले पाहिजे. हे स्मारक केवळ इमारत न करता पर्यटक व शिवप्रेमी भेट देतील अशा स्वरुपाचे ते असावे.''
 - अॅड. प्रशांत भूतकर( शिवप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com