मुंबई गोवा महामार्गावर शिवशाहीचा अपघात, विजेच्या पोलाला धडक

अमित गवळे
शुक्रवार, 27 जुलै 2018

पाली - शिवशाही गाड्यांच्या वारंवार होणार्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव व इंदापूर दरम्यान कोशिंबळे गावाजवळ गुरुवारी मध्यारात्री दोनच्या सुमारास शिवशाही बसचा अपघात झाला. बस विजेच्या खांबाला ठोकल्यामुळे खांबासह विजेच्या तारा देखिल तुटल्या. या अपघातात कोणी गंभीर जखमी झाले नाही.

दापोली - बोरीवली हि शिवशाही बस रात्री दोनच्या सुमारास कोशिंबळे गावाजवळ अाली असता गाडीच्या स्टेअरींगमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे गाडी रस्त्यावर हेलकावे घेवू लागली. चालकाने स्टेरिंगवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला ठोकून रस्याच्या खाली गेली.यात विजेच्या पोलसह विजेच्या तारा देखिल तुटल्या. सुदैवाने विजेच्या तारांचा शाॅक कोणाला लागला नाही.  तसेच अपघातामुळे कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. गाडीत एकूण २१ प्रवासी होते.मागील अनेक दिवसांपासून शिवशाही गाड्यांच्या अपघातात मोठी वाढ झाली असल्याने शिवशाहीतून प्रवास करणे जोखमीचे झाले अाहे असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे.

शिवशाहीवर काम करणारे चालकांना अपुरे प्रशिक्षण मिळत आहे.तसेच त्यांना वाहन चालविण्याचा अनूभव देखिला अपुरा आहे. असे बोलले जात आहे. तसेच काहींच्या मते गाडीमध्ये अनेक कमतरता व खराबी अाहेत त्यामूळे वारंवार अपघात होत आहेत.

Web Title: Shivashahi's accident on Mumbai-Goa highway