Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेकासाठी परभणी ते रायगड रखरखत्या उन्हात सहाशे किमीचा सायकल प्रवास Shivrajyabhishek chatrapati shivaji maharaj kokan raigad parbhani Cycles | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivrajyabhishek

Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेकासाठी परभणी ते रायगड रखरखत्या उन्हात सहाशे किमीचा सायकल प्रवास

Shivrajyabhishek - तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिनाला उपस्थित राहण्यासाठी संदीप गव्हाणे हा तरुण परभणीवरून रायगडकडे सायकलने निघाला आहे. यासाठी रणरणत्या उन्हात तब्बल सव्वा सहाशे किमीचे अंतर कापत ते रविवारी (ता.4) रायगडला पोहचले आहेत. या प्रवासात सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवरायांच्या काळातील निष्ठा व प्रामाणिकपणा यांचे महत्व ते सांगत आहेत. त्याचबरोबर सायकल चालवन्याचे महत्व सांगून तरुणांना आरोग्याचा मूलमंत्र देत आहे.

संदीप गव्हाणे परभणी वरून सोमवारी (ता.29) तारखेला सायकल घेऊन निघाले आहेत. गव्हाणे पेशाने पेंटर आहेत. याबरोबरच ते वीस वर्षांपासून शिवसेनेचे आणि सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत.

ते स्वखर्चाने या प्रवासाला निघाले आहेत. संदीप गव्हाणे यांनी सकाळला सांगितले की लहानपणापासून रायगडावर जाण्याची इच्छा होती. मात्र घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तसेच प्रवासासाठी पैसे उपलब्ध नसल्याने त्यांना रायगड वर जाता आले नाही. मात्र ते आता मंगळवारी (ता.6) असणाऱ्या साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सायकलने आले आहेत.

व्यसनाधीनतेला दूर ठेवा

संदीप यांनी सकाळला सांगितले की तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. व्यसन करण्यापेक्षा तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पाहावे त्यांचे संवर्धन करावे.

महाराजांचा आदर्श जोपासावा, महाराजांच्या विचारांवर चालावे व व्यसनापासून दूर राहावे, त्याचबरोबर सायकल चालवून आरोग्य जोपासावे. त्यामुळे आपण निरोगी राहतो. अशा प्रकारचे मार्गदर्शन गव्हाणे ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी लोकांना करतात.

लोकांचे सहकार्य

कमी पैसे व अगदी तुटपुंजे समान बरोबर घेऊन गव्हाणे निघाले आहेत. अशा वेळी प्रवासादरम्यान अनेक लोकांनी त्यांना मदत केली. चहा, नष्ट व जेवण देखील दिली. लोकांना गव्हाणे यांचा उद्देश पटत आहे.

अडचणींचा सामना

गव्हाणे यांनी सांगितले की उन्हाचा पारा खूप वाढला आहे. अशावेळी सायकल चालवतांना उन्हाचा खूप त्रास होतो. वारंवार पाणी प्यावे लागते. शिवाय शारिरीक थकवा देखील येतो. तसेच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने देखील प्रवासात व्यत्यय आणला.

उद्धव ठाकरेंना पाठींबा देण्यासाठी त्यांची व आदित्य ठाकरेंची भेट घेतली होती. या सायकल प्रवासातून लोकांना शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याची माहिती देतो. सध्या माणुसकी राहिली नाही आहे. लोकांनी फक्त नुसतेच पैशांच्या मागे जाऊ नये. तसेच राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांनी देखील निष्ठा जोपासणे गरजेचे आहे.