महागाईच्या विरोधात चिपळूणात शिवसेनेची निदर्शने

चिपळूण - इंधन दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देताना शिवसेनेचे पदाधिकारी.
चिपळूण - इंधन दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देताना शिवसेनेचे पदाधिकारी.

चिपळूण - वाढती महागाई व सततच्या पेट्रोल, डिझेल दरवाढ निषेधार्थ शिवसेनेकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भाजप सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रांताधिकारी कार्यालयासमोर यावेळी निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाध्यक्ष प्रताप शिंदे, शहरप्रमुख राजू देवळेकर, पालिकेतील गटनेत्या जयश्री चितळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

केंद्रात व राज्यातील भाजप सरकार सर्व सामान्य जनतेला न्याय देऊ शकले नाही. विकासाच्या बाबतीत जाहिरातीद्वारे सतत दाखविण्याऱ्या खोट्या आकडेवारीमुळे सर्वसामान्य जनता भाजवर नाराज आहे. सर्वच पातळीवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर उतरल्यावर पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी आंतराष्ट्रीय बाजारपेठेते पेट्रोल, डिझेलचे भाव कमी-जास्त होत असताना देखील भाव वाढ सुरूच ठेवली आहे. दरवाढ रोखणे सरकारच्या हाती नाही, असे पेट्रोलियममंत्री सांगत आहेत. तरीही भाजपकडून अच्छे दिनचा दावा केला जात आहे, असा आरोप जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी केला. 

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा

महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना पेट्रोल व डिझेल भाव वाढीने त्यात आणखी भर पडली आहे. ही फसवणूक थांबवून सर्वसामान्य जनतेच्या भावनेचा आदर करत पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com