शिवसेनेची अवस्था निर्नायकी; नेत्यांत भांडणे

shivsena
shivsena

मंडणगड - आघाडीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंने राज्यातील सत्ताकारणापेक्षा स्थानिक सत्ताकारणाला साजेशी भूमिका वेळोवेळी घेतली आहे. त्यामुळे ते नेहमीच सत्ताधारी पक्षात असतात. असे असले तरी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत घराडी ग्रामपंचायतीत रिपाइंने शिवसेनेशी सोयरिक जुळविल्याने दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

राज्यात पालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत रिपाइंने भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची विचित्र अवस्था आहे. याआधी सर्व निवडणुका माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. यावेळी सेनापती कोण यावरूनच वादंग आहे. गटबाजीचा निर्णय ‘मातोश्री’वरच गेला आहे. इच्छुकांची मांदियाळी व एकाच वेळी नेत्यांचा मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी सुरू असलेला संघर्ष, यामुळे नेमका कोणत्या विठ्ठलाचा झेंडा हाती घेतल्यावर उमेदवारी मिळणार याविषयी इच्छुकच संभ्रमात आहेत. कोणाचे तिकीट कापले जाणार कोण बंड करणार, कोण घरी बसणार, कोण निष्क्रिय राहणार याविषयी तर्कविर्तक लढविले जात आहे. वरवर सारे काही आलबेल असल्याचे भासवण्याचा प्रयत्नही सुरू आहे. माजी आमदारांच्या भूमिकेवर तालुक्‍यातील राजकीय गणिते आखली जाणार असून त्यांच्या विरोधकांची तिकिटे कापली जाण्यासाठी माजी आमदार व त्यांच्या गटाच्या सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. 

नेतृत्वाने माजी आमदारांच्या मागण्या मान्य न केल्यास त्याच्या निष्क्रियतेची अथवा विरोधाची जबर किंमत शिवसेनेला आगामी निवडणुकीत तालुक्‍यात मोजावी लागणार आहे. तालुक्‍यात लहान पक्ष म्हणून गणले गेलेले मनसे, बीएसपी, बीआरएसपी, भारिप महासंघ यांच्याकडूनही येऊ घातलेल्या निवडणुकीत स्वतंत्र वाटचालीचे संकेत मिळत आहेत. सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण, गाव, खोरे, जात, समाज, आदी अस्मितांच्या विरोधाचा सामनाही करावा लागणार आहे.

युतीसाठी भाजपचे महत्त्व आहेच
युतीच्या राजकारणात तालुक्‍यात शिवसेनेकडून नेहमीच सापत्न वागणूक दिलेल्या भाजपने वर्षभरापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत युतीच्या निवडणुकांत भाजपची मते किती महत्त्वाची असतात हे दाखवून दिले. आपली ताकद आजमावण्यासाठी या दोघांनी नगरपंचायत स्वतंत्र लढल्याने भाजप सेनेच्या अकरा उमेदवारांचा थोडक्‍या मतांनी पराभव झाला. यात सेनेच्या सात सीट केवळे दोन ते पाच मतांच्या फरकांनी पडल्या आहेत. भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकांत पक्ष तालुक्‍यात पाय रोवून मतदानांचा टक्का आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com