भाजपला शह देण्यास सेनेची मोर्चेबांधणी 

Shivsena prepare To Give Check To BJP
Shivsena prepare To Give Check To BJP

बांदा (सिंधुदुर्ग ) : येथील सरपंचपदाच्या लढतीत भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान एकत्र असल्याने त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येथे शिवसेनेतर्फे मकरंद तोरस्कर, भाजपतर्फे अक्रम खान यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. ही लढत चुरशीची होण्याची शक्‍यता आहे.

 भाजपचे मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्याने बांदा सरपंच पदासाठी 8 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत सरपंच पदाची खुर्ची आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणामुळे भाजपची ताकद शहरात वाढली आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत आपला एकतर्फी विजय होण्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे.

भाजपला शह देण्यास सेनेची मोर्चेबांधणी 
भाजपने उमेदवार निवडीसाठी बैठका घेतल्या आहेत; मात्र भाजपकडून अनेक चेहरे इच्छुक आहेत. सद्यस्थितीत प्रभारी सरपंच असलेले युवा नेतृत्व अक्रम खान हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत; मात्र अद्यापपर्यंत भाजपने आपला उमेदवार जाहीर केला नाही. 

शिवसेनेने दिला मराठा चेहरा

शिवसेनेने 12 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून विभागीय अध्यक्ष तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तोरस्कर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. येत्या दोन दिवसात तोरस्कर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सरपंचपद खुले असल्याने भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने मराठा चेहरा दिला आहे. 

मकरंद तोरस्कर यांना उमेदवारी निश्‍चित 
तोरस्कर हे बांद्यातील मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे ते प्रशासकीय अधिकारी आहेत. सामाजिक, शैक्षणिक, व क्रीडा चळवळीत त्यांचे योगदान आहे. तोरस्कर यांनी पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे विद्यमान सरपंच असलेले बाळा आकेरकर यांचा एकतर्फी पराभव केला होता. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. शिवसेनेच्या बैठकीत शहरातील इच्छुक 12 उमेदवारांच्या मुलाखती माजी सरपंच तथा स्थानिक शिवसेना नेते श्रीकृष्ण काणेकर यांनी घेतल्या. या बैठकीतच तोरस्कर यांचे नाव सर्वानुमते ठरविण्यात आले. शहरात शिवसेनेचीही व्होट बॅंक आहे. महाशिवआघाडी आकाराला आली तर येथील चुरस आणखी वाढणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com