शिवसेनेतही दुसऱ्या यादीनंतर बंडखोरी?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी गोळप, पावससह नऊ पंचायत समिती गणांमधील शिवसेनेचे उमेदवार उद्या (ता. ३) जाहीर करण्यात येणार आहेत. कुवारबाव गणातील महिला उमेदवार ठरविण्यासाठी तालुकाप्रमुखांबरोबर बैठक झाली. त्यात उमेदवारांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर संगमेश्‍वर, दापोलीपाठोपाठ रत्नागिरी तालुक्‍यातही बंडखोरी उफाळण्याची शक्‍यता आहे.

उमेदवार निवडीवरून जिल्ह्यातील शिवसेनेत मोठा गदारोळ सुरू झाला आहे. संगमेश्‍वरात घराणेशाही जपल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. दापोलीत रामदास कदम, सूर्यकांत दळवींमधील वाद विकापोला गेला आहे. हे लोण रत्नागिरी तालुक्‍यात पोचण्याची शक्‍यता आहे. सेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवारांना एबी फॉर्मच्या झेरॉक्‍स तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी दिल्या. त्यावेळी झालेल्या बैठकीत कुवारबाव गणातील उमेदवारावरही शिक्‍कामोर्तब करण्यात आले. या गणातून इच्छुक असलेल्या ममता जोशी यांचे नाव मागे पडल्याची चर्चा सुरू आहे. 

कुवारबावसह नऊ गण आणि दोन गटांची यादी उद्या जाहीर होणार आहे. गोळप गटातील तिढा सुटला आहे. तेथे मंगेश साळवी यांच्या पत्नीला संधी दिली जाणार आहे. पावस येथील उमेदवारीबाबत धक्‍कादायक निर्णय होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

या गटामध्ये किरण तोडणकर यांच्या पत्नी अंकिता तोडणकर यांना सर्वसाधारण गटातून उमेदवारी देण्याची मागणी आहे. आमदार उदय सामंत समर्थक सुनील नावले इच्छुक आहेत. त्यांचे पारडे जड आहे. येथील उमेदवारीवरून गोंधळ निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

स्थानिकाला संधी द्यावी, अशी मागणी आहे. ती पूर्ण न झाल्यास सेनेपुढे पेच निर्माण होऊ शकतो. यामुळेच पावसचा निर्णय अद्याप झाला नाही. या गटातून राष्ट्रवादी-काँग्रेस-बविआकडून विद्यमान सदस्य नंदकुमार मोहिते रिंगणात उतरणार आहेत. या गटात कुणबी फॅक्‍टर चालण्याची भीती 
शिवसेनेलाही आहे.

उमेदवारांची नावे निश्‍चित...
देऊड गणातून अभय खेडेकर यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. खेडेकर यांनी उमेदवारीसाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवली आहे. येथून सुभाष रहाटे यांच्या नावाची चर्चा होती. वाटद, मालगुंड, कर्ला, फणसोप, गोळप, पावस, गावखडी या गणातील उमेदवार निश्‍चित झाले आहेत. ही यादी खासदार विनायक राऊत किंवा संपर्कप्रमुख विजय कदम जाहीर करणार आहेत.

Web Title: shivsena rebellion after the second list?