वेंगुर्लेत शिवसेना स्वबळावरच - अजित सावंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

वेंगुर्ले - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवर निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला आहे. येत्या दोन दिवसांत शिवसेनेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. कोणत्याही पक्षाशी युती न करता दुसऱ्या पक्षांनी नाकारलेल्या उमेदवारांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली जाणार नसल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना जिल्हा उपप्रमुख अजित सावंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार पत्रकार परिषद घेऊन जिल्हा शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असून कोणाशीही युती केली जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेची ताकद दाखविण्याची ही नामी संधी शिवसेना कार्यकर्त्यांना मिळाली आहे. महाराष्ट्र म्हणजे शिवसेना असे समीकरण असताना शिवसेनेचे बोट धरून सत्तेत आलेले लोक आज पक्षाला औकात दाखविण्याची भाषा करीत आहेत. इतर पक्षांतील लोकांना आपल्याकडे घेत पक्ष वाढल्याची भाषा करीत आहेत. त्यांना सत्तेची सूज आलेली आहे. तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्वच्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढविणार असून इतर पक्षांनी नाकारलेल्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘बारा वर्षांपूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचा कोणीही मोठा नेता नसताना सच्चा शिवसैनिकांनी पक्ष जिवंत ठेवला. पक्षाचे निष्ठेने काम केले. संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच येथेही शिवसेना स्वबळावर लढून आपली ताकद दाखवून देणार आहे. शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार निश्‍चित झाले असून, येत्या दोन दिवसांत त्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. ज्यांची औकात नाही त्यांनी आमची औकात काढण्याच्या भानगडीत पडू नये.’’ या वेळी उपतालुकाप्रमुख मनोहर येरम, शहरप्रमुख विवेक आरोलकर, विभागप्रमुख रमेश नार्वेकर, गोविंद गवंडे, संतोष मांजरेकर, उदय गोवेकर, सुरेश वराडकर, शाखाप्रमुख अजित पराडकर, सुरेश भोसले, कार्यालयप्रमुख बाळा नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: shivsena self power in vengurle