काँग्रेसच्या मदतीने दापोलीत शिवसेनेचा भगवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

दाभोळ - दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेच्या उल्का जाधव निवडून आल्या.

उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रजिया रखांगे निवडून आल्यावर शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या कृपा घाग, उल्का जाधव व शबनम मुकादम यांनी, तर भाजपच्या जया साळवी व राष्ट्रवादीच्या नम्रता शिगवण व काँग्रेसच्या रजिया रखांगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या कृपा घाग व काँग्रेसच्या रजिया रखांगे यांनी अर्ज मागे घेतले.

आज नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उल्का जाधव यांना काँग्रेसची ४ व शिवसेनेची ७ अशी ११ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नम्रता शिगवण यांना राष्ट्रवादीची ४, तर भाजपच्या जया साळवी यांना भाजपची २ मते मिळाली. शिवसेनेच्या शबनम मुकादम यांना शून्य मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेच्या सौ. जाधव निवडून आल्या.

उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सचिन जाधव व काँग्रेसच्या रजिया रखांगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत काँग्रेसच्या रजिया रखांगे यांना ११, तर राष्ट्रवादीच्या सचिन जाधव यांना ४ मते मिळाली. भाजपचे २ नगरसेवक उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनुपस्थित राहिले. उल्का जाधव व रजिया रखांगे निवडून आल्याची घोषणा उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांनी केल्यावर नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, दापोलीचे प्रभारी तालुकाध्यक्ष डॉ. वसंत मेहेंदळे, युवा सेनेचे योगेश कदम, भगवान घाडगे, संदीप राजपुरे, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले. नगरपंचायतीबाहेर फटाक्‍यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जयराम देशपांडे यांनी, तर सहाuक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी काम पाहिले. मावळते नगराध्यक्ष जावेद मणियार यांनी नगराध्यक्षपदाच्या दालनात नवनिर्वाचित नगराध्यक्षा जाधव व उपनगराध्यक्षा रखांगे यांना नेले व नगराध्यक्षपदाची सूत्रे सौ. जाधव यांच्याकडे सोपवली.

काँग्रेसचा राष्ट्रवादीशी काडीमोड

दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी केली होती. त्यात काँग्रेसचे ४ व राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे ७, तर भाजपचे २ नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपदासाठी निवडून येण्यासाठी ९ मतांची आवश्‍यकता होती. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर दापोलीचे आमदार संजय कदम यांनी भाजपला नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आघाडी पाठिंबा देईल, असे  आश्‍वासन दिले होते; मात्र त्यासाठी काँग्रेसला विश्‍वासात घेतले गेले नाही, असे विधान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केले होते. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली होती. भाई जगताप यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर कोणताही धोका होऊ नये, यासाठी काँग्रेस व शिवसेनेचे नगरसेवक तीन दिवसांपासून दापोलीबाहेर होते.

Web Title: shivsena success by congress support in dapoli