सावंतवाडी - पदवीधर मतदार संघात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसची मदत

अमोल टेंबकर
गुरुवार, 21 जून 2018

सावंतवाडी : पदवीधर मतदार संघात भाजपला शह देण्यासाठी जिल्ह्यात शिवसेनेने दोन्ही काँग्रेसची मदत घेण्याच्या दृष्टीने डावपेच आखले आहेत. आज येथे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र आले. बंद खोलीत झालेल्या चर्चेत काँग्रेस व राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे समजते; मात्र आमची ही राजकीय भेट नव्हती, असे या सर्व नेत्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस आदी नेते एकत्र आले. यावेळी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर बंद खोलीत चर्चा झाली. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला बाजूला करण्यासाठी शिवसेनेला मदत करावी, असे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आल्याचे समजते. या चर्चेसंदर्भात नेत्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. श्री. सावंत यांचा वाढदिवस असल्यामुळे याठिकाणी आम्ही आलो होतो. याचा राजकीय अर्थ कोणी काढू नये; परंतु विकासासाठी आम्ही कधी एकत्र येण्यास तयार आहोत, अशी भूमिका पत्रकारांशी बोलताना या तिन्ही नेत्यांनी मांडली.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 25 ला होत आहे. भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी उमेदवार दिले आहेत. यात शिवसेना आणि भाजपमध्ये खरी चुरस आहे. नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सर्व पक्षांकडून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवरवर आज त्रिमूर्तीं ची झालेली भेट ही चर्चेचा विषय बनली आहे.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रूपेश राऊळ, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, सागर नाणोस्कर, मंदार शिरसाट, अमित मोर्ये, सी. एल. नाईक, दिनेश नागवेकर, नारायण देवकर आदी उपस्थित होते.

काय झाली चर्चा?
विकास सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राणी पार्वतीदेवी स्कूल मध्ये सर्व पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी चर्चा केली. यात झालेल्या चर्चेत भाजपाला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला मदत करावी, अशी मागणी उपस्थित पदाधिकार्‍यांकडून करण्यात आल्याचे समजते.

Web Title: shivsena takes help of rashtravadi and congress for graduate constituency in sawantwadi