Vidhan Sabha 2019 : शिवसेना सतीश सावंत यांच्या पाठीशी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कणकवली - स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत नारायण राणेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या सतीश सावंत यांचे अभिनंदन आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन केले. सतीश सावंत यांच्या पुढील वाटचालीसाठी शिवसेनेची खंबीर साथ असेल. तसेच सर्व शिवसेना कार्यकर्ते देखील आपल्या पाठीशी राहतील, अशी ग्वाही नाईक यांनी दिली. 

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि राणेंचे खंदे शिलेदार सतीश सावंत यांनी काल (ता. 30) स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला होता. राणेंपासून फारकत घेत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आज शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सतीश सावंत यांची त्यांच्या कलमठ येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

या भेटीत श्री. नाईक यांनी, सतीश सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सिंधुदुर्गातील संपूर्ण शिवसेना आपल्या पाठीशी भक्‍कमपणे उभी असल्याची ग्वाही दिली. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड, भास्कर राणे, हर्षद गावडे, बाळू पारकर, महेश देसाई, सुनील पारकर, भूषण परुळेकर, आनंद मर्गज, अरुण परब, बाबू आचरेकर, अनुप वारंग, मंजू फडके, सिद्धेश राणे उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena will support Sathish Sawant Vaibhav Naik comment