सेनेच्या वजनदार महिला नेत्या काँग्रेसच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मंडणगड - तालुक्‍यात राजकीय भूकंप होण्याची शक्‍यता असून, शिवसेनेतील एक वजनदार महिला नेत्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. आगामी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार की नाही याची शंका निर्माण झाल्याने शिवसेना सोडण्याच्या निर्णयाप्रत त्या आल्या असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे प्राथमिक चर्चा झाली, असा दुजोरा काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिला.

शिवसेनेकडून पंचायत समितीसाठी नवीन उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्‍यातील पंचायत समितीच्या एका गणातून बड्या महिलेला डावलून त्या ठिकाणी नवीन चेहरा देण्याचे निश्‍चित झाले आहे. याची कुणकुण लागताच सेनेतील त्या बड्या महिलेने काँग्रेसच्या कळपात शिरण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. तशा प्रकारची प्राथमिक चर्चाही त्या महिलेने काँग्रेस पक्षश्रेष्ठींबरोबर केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढले तर त्यांच्यावरही नवीन चेहरा शोधण्याची वेळ येईल; मात्र जर त्या महिलेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आपोआपच काँग्रेसची ताकद वाढून आयता उमेदवारही मिळू शकतो. निवडणुकीच्या तोंडावर आयाराम आणि गयाराम यांची चलती सुरू होणार असल्याने काँग्रेसच्या या आमंत्रणाला त्या महिलेने होकार दिल्याचे मानले जाते. 

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही दिवसांत आचारसंहिताही लागू होण्याची शक्‍यता आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, बीआरएसपी या प्रमुख पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कुणाला उमेदवारी द्यायची याची खलबते सुरू झाली आहेत; मात्र तालुक्‍यात शिवसेना भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आघाडीतील पदाधिकारी आता आघाडी करण्याबाबत चर्चा करीत नसले, तरी अंतिम क्षणी आघाडी होण्याची दाट शक्‍यता आहे. आघाडी झाली नाही तर काँग्रेसचे बळ वाढण्यासाठी या महिला नेत्याचा उपयोग होऊ शकेल.

Web Title: shivsena women candidate entry in congress party