त्या वाहकाचा पहिला अन् अखेरचाच प्रवास

त्या वाहकाचा पहिला अन् अखेरचाच प्रवास

सावंतवाडी -अवघ्या चार महिन्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल झालेल्या सागर यांचा वाहक म्हणून पहिलाच प्रवास जीवघेणा ठरला.

सागर हे ड्रायव्हर कम कंडक्‍टर म्हणून भरती झाले होते.  चार महिने ड्रायव्हर म्हणून काम केल्यानंतर काल पहिल्यांदाच ते कंडक्‍टर म्हणून आपली ड्युटी बजावत होते. विज्ञान शाखेचे पदविधर असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरुणाचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. 

पुणे निगडी येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या येथील आगाराच्या शिवशाही बसला किणी नाका येथे झालेल्या अपघातात येथील आगाराचे वाहक सागर सुधाकर परब (वय 30 रा.कालेली माणगाव, ता. कुडाळ) हे जागीच ठार झाले. या अपघाताने परब कुटुंबाला मोठा धक्‍का बसला. येथील एसटी आगारातही सन्नाटा होता. निगडी सावंतवाडी ही बस (एम.एच.47 वाय 4716) घेवून काल सकाळी 8.30 च्या सुमारास सागर परब व चालक मोहम्मद बागवान हे पुण्याच्या दिशेने निघाले होते. पुणे येथून परतत असताना किणी टोल नाका परिसरात पुणे-बेंगलोर महामार्गावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला या गाडीची धडक दिली. बसच्या डाव्या बाजुला पहिल्या कंडक्‍टर सीटवर बसलेले सागर यांचा जागीच मृत्यू झाला. परब कुटुंबासाठी हा मोठा धक्‍का आहे. 

सागर यांचे बालपण सावंतवाडी गेले. परब कुटुंब मुळचे माणगाव जवळच्या कालेली गावचे. गेली बरीच वर्षे परब कुटुंबिय येथील भटवाडीमध्ये राहते. त्यांचे वडिल पोलिस खात्यात नोकरीला होते. ते आता निवृत्त आहेत. सागर हे ड्रायव्हर कम कंडक्‍टर म्हणून भरती झाले होते. त्यांनी रेल्वेची परिक्षाही दिली होती. सागर उच्च शिक्षीत होते. त्यांनी येथे बीएसस्सीपर्यंत शिक्षण घेतले होते. मनमिळावू व हसतमुख स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. चार महिने ड्रायव्हर म्हणून काम केल्यानंतर काल पहिल्यांदाच ते कंडक्‍टर म्हणून आपली ड्युटी बजावत होते; मात्र कंडक्‍टर सेवेतच त्याच्यावर काळाने घाला घातला. 

कुटुंब उध्वस्त 
त्याचे अवघ्या दोन वर्षापुर्वीच लग्न झाले होते. अवघ्या दिड वर्षाचा मुलगाही त्याला आहे. मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांचे बंधू आहेत तर सिंधूदुर्ग पोलिसात निवृत्त झालेल्या सुधाकर परब यांचे पुत्र आहेत. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी,भाऊ, बहिण असा परिवार आहे. 

लांबचा प्रवास ठरला जीवघेणा 
सागर याची प्रथमच कंडक्‍टर म्हणून ड्युटी बजावत होते. मला पुणे येथे नको स्थानिक (लोकल) फेरी हवी. अशी त्याची मागणी होती; मात्र पहिल्यांदाज कंडक्‍टर ड्युटीवर असुनही त्याला पुणे येथे शिवशाही बसचा लांबचा प्रवास गळ्यात मारण्यात आला. तो जीवघेणा ठरल्याची चर्चा आज एसटी आगारात सुरु होती. 

संबंधित बातम्या-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com