हेदवीत नववर्षाचे स्वागत शोभायात्रेने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

गुहागर - तालुक्‍यातील हेदवी येथे श्री दशभुज फाउंडेशन हेदवी, कोकणरत्न चॅरिटेबल ट्रस्ट, हेदवी मित्रमंडळ या संस्थांनी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन केले होते. शोभायात्रेची सुरवात हेदवीतील प्रसिद्ध दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरापासून झाली. मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते गुढी उभी करून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेमध्ये ऐतिहासिक तसेच जगजागृतीचे संदेश देणारे चित्ररथ, ढोलपथक, ध्वजपथक, लेझीम पथक आदी पथकांचा समावेश होता. सदर शोभा यात्रेचा समारोप हेदवी ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाला. या वेळी दशभुज फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. 

Web Title: Shobhayatra in hedevi

टॅग्स