शिवप्रेमींनी रोखले यशवंतगड किल्ल्यामधील चित्रीकरण

Shooting Of The Southern Telugu Film Was Stopped In The Yashwantgarh Fort.
Shooting Of The Southern Telugu Film Was Stopped In The Yashwantgarh Fort.

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग) - येथील रेडी-यशवंतगड किल्ल्यामध्ये कोणतीही शासकीय परवानगी न घेता सुरू असलेले दक्षिणात्य तेलगु चित्रपटाचे चित्रीकरण पंचायत समिती सदस्य सिद्धेश परब व शिवप्रेमींनी बंद पाडले. याची दखल पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र शासन यांनी घेऊन या चित्रीकरण कंपनीला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

या किल्ल्यावर तेलगू चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्मशानभूमीचे सेटअप व किल्ल्याच्या भिंतींवर रंग काढण्याचे प्रकार सुरू होते. या चित्रीकरणाचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताच तेथे शिरोडा येथील श्री. परब व त्यांच्यासोबत रेडी येथील नागरिक अभिजीत राणे, सागर रेडकर, विठ्ठल परब, सदानंद रेडकर, शिरोडा येथील नागरिक उपस्थित होते. त्यांनी तेथे होत असलेला प्रकार रोखण्यास भाग पाडले व तेथील उभारण्यात आलेला स्मशानभूमीचा सेट त्वरित काढण्यास सांगितले. तिथे असलेल्या चित्रपटातील सहकाऱ्यांनी आम्ही हे काढतो असे सांगितले; परंतु त्यातील काही समान उशिरापर्यंत काढले नसल्याने तिथे थोड्यावेळातच काही शिवप्रेमी दाखल झाले व त्यांनी देखील याचा निषेध करत हे काढण्यात भाग पाडले.

हेही वाचा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com