कोकण : शॉर्टसर्किटमुळे गॅस सिलिंडरचा स्फोट, तीन कुटुंबांचे 11 लाखांचे नुकसान

short circuit of gas cylinder blast in mandangad three houses damages
short circuit of gas cylinder blast in mandangad three houses damages

मंडणगड (रत्नागिरी) : भरवस्तीतील घरातील वीज कनेक्‍शनचे शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात तीन कुटुंबाचे १० लाख ८८ हजार ८९५ रुपयांचे नुकसान झाले. पालघर गावठाण येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. आग रोखण्यासाठी पालघर येथील ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने जीवितहानीचा धोका टळला. सिलिंडर स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, टाकडे व केळवत येथील ग्रामस्थांना क्षणभर बॉम्बस्फोट झाल्याचा भास झाला. सरपंच बशीर कुडूपकर, समीर म्हामुणकर, गजानन तांबुटकर, अनंत घाणेकर, पोलिसपाटील विनोद भोसले, सुधाकर म्हामुणकर, आनंद गुढेकर यांच्यासह शेकडो ग्रासस्थांनी आग विझवण्याच्या कामाला सुरवात केली. दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले होते; मात्र पालघरला येण्यास विलंब लागला. तोपर्यंत ग्रामस्थांनी आग नियंत्रणात आणली.

दरम्यान, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलिस उपनिरीक्षक अमर मोरे, महावितरण अधिकारी, तलाठी मोरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. माजी नगरसेवक दिनेश लेंडे यांनी तातडीची मदत म्हणून आपद्‌ग्रस्त कुटुंबांना रेशन पुरवले. आदेश मर्चंडे यांनी आर. के. गॅस एजन्सी मंडणगडतर्फे नवीन गॅस कनेक्‍शन मोफत जोडणी तातडीने दिली.

यांचे झाले नुकसान

अरुणा विठोबा कदम यांच्या मालकीच्या घरात शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत कदम यांच्या घरातील भाडेकरू मीनाली मिलिंद खैरे व मस्तानी महमंद मुल्ला यांच्या घरगुती वस्तूंचे नुकसान झाले. खैरे यांचे प्रापंचिक सामान, मौल्यवान वस्तू, अन्नधान्य, रोकड मिळून एकूण ८३ हजार ९५५ रुपयांचे नुकसान झाले. जयवंत गंगाराम कदम यांचे प्रापंचिक सामान, मौल्यवान वस्तू, अन्नधान्य, रोकड मिळून एकूण ४० हजार २८० रुपयांचे नुकसान झाले. अरुणा विठोबा कदम यांचे एकूण ४ लाख ३४ हजार ६६० रुपयांचे, मस्तानी अहमंद मुल्ला यांचे २१ हजार तर वासंती पांडुरंग कदम यांचे ५ लाख ९ हजार रुपयांचे असे एकूण १० लाख ८८ हजार ८९५ रुपयांचे नुकसान झाले.

एक नजर

  •  टाकडे, केळवतमध्ये क्षणभर बॉम्बस्फोट     झाल्याचा भास 
  •  शेकडो ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी घेतला   पुढाकार
  •  दापोली न. पं. च्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण 
  •  पालघरला येण्यास अग्निशमनला लागला विलंब 
  •  तोपर्यंत ग्रामस्थांनी आग आणली नियंत्रणात

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com