भर पावासात दुर्गवीर प्रतिष्ठानचे मृगगडावर श्रमदान

अमित गवळे
सोमवार, 25 जून 2018

पाली - सुधागड तालुक्यातील भेलीव गावाजवळ असलेल्या मृगगड किल्ल्यावर मुंबईतील दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे नुकतीच श्रमदान मोहिम आयोजित केली होती. यामध्ये दुर्गवीरच्या सभासदांनी भर पावसात किल्यावरील विविध पाण्याचे टाके साफ केले.

मृगगडावर संपूर्ण वर्षभर येणाऱ्या दुर्ग प्रेमींना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गडावरील टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी गडावरील पाण्याच्या टाक्यातील गाळ व दगड-धोंडे मोठ्या प्रमाणात काढण्यात आले. यामुळे पावसाळ्यात या टक्यांत साचणारे किंवा झऱ्यांनी येणारे पाणी वर्षभर दुर्गप्रेमी व गडावरील प्राणी आणि पक्षी यांना पिण्यासाठी वापरता येणार आहे.

मृगगड श्रमदान मोहीमेत अर्जुन दळवी, अमित शिंदे, अमित थोरात,समीर शिंदे, वैभव सावंत, मनोज कुळे, सचिन रेडेकर, राकेश मोरे,एकनाथ असवले, प्रज्वल पाटील, श्रद्धेश जाधव, किरण थोरात आणि रामदास घाडी आदी दुर्गवीरचे सभासद सहभागी झाले होते.

गडकोट म्हणजे राज्याचे सार असे म्हणून गडकिल्ले जपणारे व दूरदृष्टीने गडबांधणीवर लक्ष देणारे आपले शिवराय. याच गडकोटांसाठी गेली कित्येक वर्षे संवर्धनातून त्याचे अस्तित्व जपण्यासाठी माझे दुर्गवीर सहकारी धडपड करत असतात.
संतोष हसूरकर, अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई

Web Title: shramadan on murudgad

टॅग्स