यंदा `या` मंडळाचा गणेशोत्सव रद्द;  मंत्री उदय सामंत यांची माहिती

Shree Ratnagiri Ganesh Raja Festival Cancelled Uday Samant Comment
Shree Ratnagiri Ganesh Raja Festival Cancelled Uday Samant Comment

रत्नागिरी - लालबागच्या राजाच्या धर्तीवर रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळाने या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला आहे. गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधासाठी काम करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी झूम ऍपवरील पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ""कोरोनाची सार्वजनिक संक्रमण साखळी तोडण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याला सार्वजनिक गणेश मंडळाने चांगला प्रतिसाद दिला. लालबागच्या राजा गणेश मंडळाने गणेशोत्सवच रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. या धर्तीवर रत्नागिरीत मारुती मंदिर सर्कल येथे श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळानेही निर्णय घेतला आहे. भाविकांनी देखील या उत्सवाला प्रतिसाद दिला. कालावधीत कोरोना प्रतिबंधासाठी मंडळाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येतील असे, श्री. सामंत यांनी सांगितले.'' 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com