esakal | रामजन्म अभियानात सहभागी व्हा  ः आमदार राणे
sakal

बोलून बातमी शोधा

Shriram Janmabhoomi Trust District Office Inauguration kudal sindhudurg

आमदार राणे म्हणाले, ""अयोध्येत राम मंदिर होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आपल्याला आली आहे.

रामजन्म अभियानात सहभागी व्हा  ः आमदार राणे

sakal_logo
By
अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) - आपल्याला इतिहासाचे साक्षीदार व्हायचे असेल तर रामजन्म अभियान मोहिमेत सहभागी होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटन जिल्हा वारकरी संप्रदाय अध्यक्ष विश्‍वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते लक्ष्मी नक्षत्र टॉवर येथे झाले. यावेळी आमदार राणे बोलत होते.

यावेळी ह.भ.प विश्‍व हिंदू परिषद माजी अध्यक्ष श्रीराम झारापकर, जिल्हा सहसंचालक अर्जुन ऊर्फ बाबा चांदेकर, येथील नगराध्यक्ष ओंकार तेली, रविकांत मराठे, भाऊ शिरसाट, सतीश घोडगे, रणजित देसाई, संध्या तेरसे, राजू राऊळ, विनायक राणे, आबा धडाम, मोहन सावंत, रुपेश कानडे, दीपलक्ष्मी पडते, सुरेश कामत, बंड्या सावंत, श्रीपाद तवटे, राकेश कांदे, जयवंत बिडये, विवेक मुतालिक, मिलिंद देसाई, अविनाश पराडकर, साक्षी सावंत, ममता धुरी, संदीप खानोलकर, रुपेश बिडये, निलेश परब, कविता कुंटे, आरती पाटील, प्रसाद नातू, लवू म्हाडेश्‍वर, एम. एस. सावंत, सुनील बांदेकर, अश्‍विनी गावडे, राजू बक्षी, विजय कांबळी, संदीप खानोलकर, विवेक पंडित तसेच विश्‍व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आमदार राणे म्हणाले, ""अयोध्येत राम मंदिर होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आपल्याला आली आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग असावा यासाठी हे अभियान आहे. ज्यांनी अयोध्यामध्ये जाऊन सेवा केली, आंदोलनात सहभागी झाले यांचा गौरव या ठिकाणी झाला.

आपल्याला इतिहासाचे साक्षीदार व्हायचे असेल तर अशा प्रकारच्या अभियानात काय करू शकतो. याचा विचार प्रत्येकाने आत्मसात केल्यास त्यातून मिळणारे समाधान वेगळे असते. समाजात आपण ज्या ठिकाणी वावरत असतो, त्या ठिकाणी आपण समाजाचे देणे लागतो ही उदात्त भावना जोपासून प्रत्येकाने या मोहिमेत 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. माझ्या मतदारसंघातील 263 गावांचा या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग असेल. या अभियानास उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा.'' 

शहर श्रीराममय 
विश्‍व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष श्रीराम झारापकर म्हणाले, अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहत आहे, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे काळाची गरज आहे. आज या सोहळ्याच्या निमित्ताने शहर श्रीराममय झाले आहे, भक्तिमय झाले आहे. राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस आहे. कुडाळ शहर आध्यामिक वातावरणात न्हाऊन निघाले आहे, असे सांगून सर्वांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. विवेक मुतालिक यांनी सूत्रसंचालन केले. 

जिल्ह्यात भव्य रथ दाखल 
श्रीराम अभियान मोहीम पार्श्‍वभूमीवर 14 जानेवारीला 10 फुटी भव्य श्रीरामाचा फोटो असलेला रथ संपूर्ण जिल्ह्यात वातावरण निर्मितीसाठी दाखल होत आहे. युवकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राणे यांनी केले आहे. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top