नारायण राणे अजून नवखे  - श्‍वेता शालिनी

नारायण राणे अजून नवखे  - श्‍वेता शालिनी

कणकवली -  खासदार नारायण राणे अजून नवखे आहेत. मुलावर संस्कार होण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे भाजपत येणारे आज ना उद्या निश्‍चितपणे सुधारतील. आम्हीही भाजपत येणाऱ्यांवर योग्य ते संस्कार करीत आहोत, असे  भाजपच्या प्रवक्‍त्या व प्रदेश उपाध्यक्षा श्‍वेता शालिनी यांनी स्पष्ट केले.

खासदार नारायण राणे यांच्याकडून वारंवार भाजपवर टीका होत आहे. याबाबत पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर श्वेता शालिनी यांनी उत्तर दिले. 

शिवसेना पक्षाकडून स्वबळाची भाषा बोलली जात आहे; पण काहीही झाले तरी शिवसेनेला भाजपशिवाय पर्याय नाही. त्यांची, आमची हिंदुत्ववादी विचारसरणी एकच आहे. त्यामुळे आम्ही पूर्वी आणि आता जसे एकत्र आहोत तसेच पुढेही राहणार. 

- श्‍वेता शालिनी,  भाजपच्या प्रवक्‍त्या व प्रदेश उपाध्यक्षा

राफेल विमान कराराबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी श्‍वेता शालिनी यांनी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यात या विमान खरेदीत कोणताही घोटाळा नाही. काँग्रेसकडून चुकीची माहिती पसरवली जातेय. त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही जनजागृती करतोय असे त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, अतुल रावराणे, संदेश सावंत-पटेल, आनंद सावंत, प्रज्ञा ढवण, गीतांजली कामत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपने ५० वर्षे पराभव पाहिला आहे. त्यामुळे तीन राज्यांतील पराभवामुळे आम्ही खचलेलो नाहीत. काही मतांच्या फरकामुळे तीन राज्ये आम्हाला गमवावी लागली; मात्र त्याची भरपाई पुढील काळात निश्‍चितपणे करू असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

राफेल विमान तयार करणाऱ्या कंपनीत भागीदारी असणाऱ्या रिलायन्स कंपनीकडे तेवढे इन्फ्रास्ट्रक्‍चर आहे का? याबाबत विचारणा केल्यानंतर शालिनी यांनी त्याबाबतची माहिती आपणाकडे नाही असे स्पष्ट केले. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चांगली छबी खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर सतत खोटे आरोप करीत आहेत. त्यामुळेच आम्ही राफेलचा मुद्दा गावागावात जाऊन सांगत असल्याचेही शालिनी म्हणाल्या.

निवडणुका जवळ आल्याने सबुरीचे धोरण
तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपचा सहकारी पक्षासोबत बोलण्याचा सूर बदलला आहे. नरमाईची भूमिका घेतली जात आहे. या प्रश्‍नावर बोलताना शालिनी यांनी, आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही सबुरीचे धोरण स्वीकारले असल्याचे मान्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com