साटेलीत एकावर कोयत्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सावंतवाडी : पुतणीला शिवीगाळ का केली याची विचारणा केल्याच्या रागातून गावातील तरूणाने पुतणीच्या काकावर कोयत्याने हल्ला केला. हा प्रकार सोमवार (ता. 27) रात्री 9:30 वाजता साटेली तर्फे सातार्डा येथे बाजारपेठेत घडला.

यात काका रघुनाथ नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याची तक्रार सदगुरू नाईक यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली असून संशयीत ज्ञानेश्वर गंगाराम सावंत त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी माहिती ठाणे अंमलदार  गुरुनाथ भागवत यांनी दिली. दरम्यान ज्ञानेश्वर याला अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: sickle Attack in sateli