सिद्धटेकः पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या घटनेनंतर काही तासांतच रेल्वेरुळावर रमेशनेही आत्महत्या केली. पत्नीच्या खूनाची घटना काल(ता.2) मध्यरात्रीनंतर घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तर रमेशने लिंपणगाव (ता.श्रीगोंदे) येथील रेल्वेरुळावर आत्महत्या केल्याची खबर कर्जत पोलिसांना मिळाली. 

सिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या घटनेनंतर काही तासांतच रेल्वेरुळावर रमेशनेही आत्महत्या केली. पत्नीच्या खूनाची घटना काल(ता.2) मध्यरात्रीनंतर घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तर रमेशने लिंपणगाव (ता.श्रीगोंदे) येथील रेल्वेरुळावर आत्महत्या केल्याची खबर कर्जत पोलिसांना मिळाली. 

दरम्यान, या दोन्ही घटनेमागील कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. एरवी जिव्हाळ्याचे वातावरण असलेल्या शिंदे कुटुंबातील या घटनांनी मात्र परीसरातील सर्वांनाच अचंभित केले आहे. असे असले तरी एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे त्यातील गूढ मात्र वाढले आहे.

उज्ज्वला रमेश शिंदे (वय 38 वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती रमेश गणपत शिंदे (वय-42 वर्षे) यानेही काही तासांतच आत्महत्या केली. याबाबत समजलेली माहिती अशी की, रमेश हा सुमारे दोन महिन्यांपासून आजारी होता. पुण्यातील ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार केल्यानंतर महिनाभरापूर्वीच त्याला घरी सोडण्यात आले होते. त्याचे वागणूकदेखिल विचित्र होती. काल रात्री रमेश हा त्याची दोन मुले अनिकेत (वय-16 वर्षे) व संदेश (वय-13 वर्षे) यांना घेऊन घराबाहेर झोपला होता. त्याची पत्नी घरामध्ये झोपली होती. पहाटे उठल्यानंतर रमेश दोन्ही मुलांना घेऊन सिद्धटेक रस्त्यावर गेला. भीमानदीवरील पूलाजवळ दोघांनाही चकवून तो काही अंतरापर्यंत एकटा चालत गेला. नंतर तो येथे मुक्कामाला असणाऱ्या एसटीने पसार झाला. वडील माघारी न आल्यामुळे दोन्ही मुलांनी रमेशचा शोध घेतला परंतु, तो सापडला नाही. दरम्यान घरी परतल्यानंतर मुलांना घरातील आईचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी इतरांना घटनेविषयी माहिती दिली. नंतर ही घटना उघड झाली. पोलिस पाटील दादासाहेब भोसलेंनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सूरड मेढे घटनास्थळी दाखल झाले. तेथील पंचनामा उरकल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरता कर्जतला नेण्यात आला. तेवढ्यातच रमेशनेही आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांना मिळाली. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे लिंपणगाव येथे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास उपनिरीक्षक मेढे करीत आहेत.

मुलांनी शिक्षण सोडले...
रमेशचा मोठा मुलगा अनिकेत हा दहावीत तर संदेश आठवीत शिकत आहे. हालाखीची परिस्थिती असलेला रमेश शेतमजुरी करीत होता. त्यामुळे कर्जतमधील आश्रमशाळेत या दोघांच्याही शिक्षणाची सोय त्याने केली होती. रमेशच्या आजारपणामुळे दिवाळीच्या सुटीत घरी आलेली दोन्ही मुले आजारी रमेशची सेवा करण्यासाठी शाळा सोडून त्याच्याजवळ राहीली होती. रमेश सांगेल ते काम हे दोघेही करीत होते. कामे उरकल्यानंतर रमेशसाठी परीसरातून फळे आणण्याचा त्यांचा दिनक्रम ठरलेला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. परंतु आता या दोघांवरील छत्र निघून गेल्याने त्यांचा निरागसपणा अनेकांच्या डोळ्यांतील अश्रूंच्या रुपात दिसत होता.

Web Title: Siddhatek: husband murdered wife then commits suicide