सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी सात हवामान केंद्राना मंजुरी : नातू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी सात हवामान केंद्राना मंजुरी : नातू

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यासाठी नव्याने सात महसूल मंडळामध्ये जागा निश्‍चित करण्यात आली आहेत. एकूण ३९ महसूल मंडळापैकी ३३ महसूल मंडळाच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर आता नव्याने सात ठिकाणी स्वयंचलित हवामान यंत्रे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी अरुण नातू यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदलत्या हवामानाची अचूक नोंद करता यावी यासाठी जिल्ह्यात ३९ महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची जबाबदारी (ठेका) स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार ३९ महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्‍यक जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. २०१२ पासून स्वयंचलित हवामान मापक यंत्रे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जागा उपलब्ध झालेल्या ३३ महसूल मंडळाच्या ठिकाणी हवामान केंद्रे उभारण्यात आली. तर सहा महसूल मंडळाच्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली नव्हती; मात्र आता जागा उपलब्ध झाल्याने लवकरच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तर आंबोली या ठिकाणी दोन हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ महसूल मंडळामध्ये ४० ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे निर्माण केली जात आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३३ ठिकाणी हवामान केंद्रे स्थापन झाली आहेत, तर आता नव्याने निश्‍चित झालेल्या केंद्रामध्ये कणकवली तालुक्‍यात सांगवे जलविज्ञान प्रकल्प, कुडाळ तालुक्‍यात कडावल येथे जलविज्ञान प्रकल्प व वालावल येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा चेंदवण क्र. १, वेंगुर्ले तालुक्‍यात वेतोरे येथे ग्रामपंचायत कार्यालय, म्हापण येथे निवती पोलिस ठाणे, मालवण तालुक्‍यात मसुरे येथे न्यू इंग्लिश स्कूल माळगाव तसेच आंबोली महसूल मंडळात सांगेली धनगरवाडी येथे जादा स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. नातू यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com