कणकवली तालुक्यातील तळेरेमध्ये आगीत कापडाचे दुकान खाक

कृष्णकांत साळगांवकर, तुषार सावंत
सोमवार, 15 जानेवारी 2018

कणकवली - तालुक्यातील तळेरे येथील बांदिवडेकर काँम्प्लेक्स मधील लक्ष्मी कापड दुकानाला सकाळी सातच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. 

कणकवली - तालुक्यातील तळेरे येथील बांदिवडेकर काँम्प्लेक्स मधील लक्ष्मी कापड दुकानाला सकाळी सातच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काही महिन्यापूर्वी एका दुकान व्यावसायिक मालकाकडून रोहिदास बांदिवडेकर यांनी कापड दुकान भाड्याने घेतले होते. नेहमी प्रमाणे सकाळी आठ वाजता त्याने दुकान उघडले तेव्हा त्याला दुकानात धुर दिसला. त्याने तातडीने त्याच्या कामगारांना तसेच आसपासच्या ग्रामस्थांना माहिती देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण आगीने राैद्यरुप धारण केले होते. यात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दुकानामध्ये जवळपास एक लाख रूपयांचे फर्निचर होते. तर आठ लाख रुपयांचे कापडाचे साहित्य होते. 

दुकानावर मी पाच लाखाचे कर्ज काढले होते. दुकानामध्ये आठ लाखांचे कापड साहित्य होते. या आगीत ते सर्व जळून खाक झाले आहे. एक लाखाचे फर्निचही जळाले आहे. आता हे कर्ज कसे फेडायचे ही मोठी समस्या माझ्या समोर आहे. 

- रोहिदास बांदिवडेकर

 

 

Web Title: Sindhdurg News fire to shop in Talere