वेंगुर्लेत "सिंधू स्वाध्याय'साठी प्रयत्न : आमदार केसरकर

sindhu swadhyay kendra issue statement mla deepak kesarkar vengurla konkan sindhudurg
sindhu swadhyay kendra issue statement mla deepak kesarkar vengurla konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मुंबई विद्यापीठाचे झाराप येथील उपकेंद्र लवकर व्हावे आणि वेंगुर्ले येथे सिंधू स्वाध्याय केंद्र सुरू करावे म्हणून प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दोन दिवसांत पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. 

आमदार म्हणाले, की ""मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र झाराप येथे सुरू व्हावे म्हणून जमीन खरेदी केली आहे. त्या ठिकाणी इमारती बांधून ते सुरू करण्यास विलंब होणार असल्याने भाड्याने जागा घेऊन ते सुरू केल्यास पुढील वर्षापासून ते केंद्र सुरु होईल. यासाठी बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. वेंगुर्ले येथील पर्यटन स्वागत कक्षात सिंधू स्वाध्याय केंद्र सुरू करावे, असा माझा प्रयत्न आहे.

या शैक्षणिक वर्षापासून दोन्ही उपक्रम सुरू व्हावेत, अशी मागणी आहे. झाराप उपकेंद्रात प्रोफेशनल शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, हॉटेल मॅनेजमेंट असे मुंबई विद्यापीठ अंतर्गत सर्वसमावेशक शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी पालकमंत्री असताना प्रयत्न होते. विद्यमान पालकमंत्री सामंत यांच्याकडे तंत्रशिक्षण मंत्रालय आहे. त्यांच्या माध्यमातून दोन दिवसांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये तो निर्णय घेतला जाईल.'' 

वनखात्याने निधी अखर्चित ठेवला 
आमदार म्हणाले, ""वन्य प्राणी वर्दळ लोकवस्तीत वाढत आहे. त्यामुळे लोकांवर हल्ला व शेतीचे नुकसान होत आहे. अशा वन्य प्राण्यांचे संवर्धन करताना त्यांना एकत्रित स्थलांतर करण्याची गरज आहे. त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी वन संवर्धन केंद्र कायमस्वरूपी उभारले जावे. ते केंद्र मंजूर केले आहे. शेतीचे नुकसान थांबले पाहिजे. केरळच्या धर्तीवर ते करावे. सिंधुदुर्ग वनखात्यात विविध उपक्रमांसाठी निधी दिला; मात्र त्यांनी तो योग्य पद्धतीने खर्च केला नाही. 

55 लाखांचा निधी दिला, पण... 
वनखात्याने नियोजित आराखडे तयार केले नाहीत. तत्कालीन उपवनसंरक्षकांनी चुकीचे धोरण आखले होते. 55 लाख रुपयांचा निधी दिला; पण बराच खर्च झाला नाही. हत्ती प्रतिबंध म्हणून खंदक खोदले; मात्र ते मातीने भरले आहेत. या खंदकात पाणी निचरा होण्यासाठी मार्ग नाही तसेच लोकांच्या शेतीचे आणि लोकांवर हल्ला करणाऱ्या प्राण्यांचे संवर्धन व्हावे म्हणूनही निधी मंजूर केला होता. त्याचा विनियोग झाला नाही. 

चौकशीची मागणी करणार 
तत्कालीन उपवनसंरक्षकांच्या सर्व कामांची चौकशी करावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. फुलपाखरू उद्यान, नरेंद्र डोंगर पर्यटन केंद्र अशा वेगवेगळ्या योजनांसाठी निधी देऊनही तत्कालीन उपवनसंरक्षक यांनी तो योग्य पद्धतीने खर्च केला नाही आणि अखर्चित ठेवला. वन खात्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना गोंधळ उडाला आहे. त्याबाबत खातरजमा करण्यात येईल. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे वनखाते असल्यामुळे त्यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे.'' 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com