मालवणमध्ये रविवारी सिंधुकॉन वैद्यकीय परिषद - डॉ. रेडकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मालवण - डॉक्‍टर्स फ्रॅटर्निटी क्‍लबतर्फे १६ ला पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सिंधुकॉन २०१७ ही वैद्यकीय परिषद घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांना वैद्यक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान तसेच अन्य महत्त्वाच्या बाबींबाबत अद्ययावत करण्यासाठी ही वैद्यकीय परिषद घेण्यात येत असून, परिषदेस जिल्ह्यातील जास्तीत जास्त डॉक्‍टरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. विवेक रेडकर व डॉ. राहुल पंतवालावलकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

मालवण - डॉक्‍टर्स फ्रॅटर्निटी क्‍लबतर्फे १६ ला पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सिंधुकॉन २०१७ ही वैद्यकीय परिषद घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांना वैद्यक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान तसेच अन्य महत्त्वाच्या बाबींबाबत अद्ययावत करण्यासाठी ही वैद्यकीय परिषद घेण्यात येत असून, परिषदेस जिल्ह्यातील जास्तीत जास्त डॉक्‍टरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. विवेक रेडकर व डॉ. राहुल पंतवालावलकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

येथील हॉटेल स्वामी येथे सायंकाळी पत्रकार परिषद झाली. या वेळी डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, डॉ. राहुल वझे, डॉ. हरिष परुळेकर, डॉ. अमोल झांटये, डॉ. मालविका झांटये, डॉ. शुभांगी जोशी यांच्यासह अन् डॉक्‍टर उपस्थित होते.

भारतातील एकमेव अशी सर्व वैद्यकीय शाखांची डॉक्‍टर्स फ्रॅटर्निटी क्‍लब ही संस्था १९७६ पासून कार्यरत आहे. या वर्षी वर्षभर तालुक्‍यास संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या वर्षाची सुरवात डॉक्‍टरांसाठी शैक्षणिक उपक्रमाने केली जाणार आहे. यात १६ ला पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सिंधुकॉन २०१७ ही वैद्यकीय परिषद घेण्यात येत आहे. या परिषदेस कोकण असोसिएशन ऑफ फिजिशियन या संस्थेने पुरस्कृत केले आहे. परिषदेचे उद्‌घाटन सकाळी दहा वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. परिषदेत ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांना अद्ययावत करण्यासाठी डॉ. हिरेमठ हे मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर डॉ. श्रीधर गणपती, डॉ. संतोष शिंदे, डॉ. सत्येंद्र ओझा, डॉ. निरंजन शहा, डॉ. चारुदत्त भागवत यांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. यात अतिदक्षतेवेळी रुग्णांची पहिल्या तासामध्ये कशी काळजी घ्यावी यासाठी डॉ. अलिमियाँ परकार व डॉ. मकरंद परुळेकर यांच्यासह अन्य डॉक्‍टरांचे एक तासाचे गोल्डन अवर हे महत्त्वाचे सत्र होणार आहे, 

अशी माहिती परिषदेच्या कार्यकारी सचिव डॉ. मालविका झांटये यांनी दिली.  
परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, डॉ. राहुल वझे, डॉ. राजेश्‍वरी वझे, डॉ. हरिष परुळेकर, डॉ. शुभांगी जोशी, डॉ. उज्ज्वल मुरवणे, डॉ. अविनाश झांटये, डॉ. अमोल झांटये, डॉ. अच्युत सोमवंशी, डॉ. रूपाली वालावलकर, डॉ. राहुल वालावलकर हे कार्यरत आहेत. परिषदेत सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक तुपकर व वेंगुर्ले होमिओपथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी केळकर यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाचे उदयोन्मुख डॉक्‍टर म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांना यू.एस.व्ही.च्या उपाध्यक्षा फरिदा हुसेन यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कणकवली येथील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. सविता तायशेटे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या परिषदेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त डॉक्‍टरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

महिला डॉक्‍टरांचा पुढाकार
परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्‍यातील महिला डॉक्‍टरांनी या परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे. या सर्वांना असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाच्या परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Web Title: sindhucon medical conferance in malvan on sunday