सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणात बदल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वातावरणात आज अचानक बदल झाला. काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या असून जिल्हाभर दमट वातावरण आहे.

नाडा नावाचे वादळ बंगालच्या उपसागरात घोंगावत असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला होता. हे वादळ तामिळनाडूच्या दिशेने सरकत होते; मात्र अरबी समुद्रात याचे कोणतेही परिणाम दिसत नव्हते. या पार्श्‍वभूमीवर आज अचानक वातावरणात बदल व्हायला सुरवात झाली. उष्मा अचानक वाढला. आज दुपारी ऑक्‍टोबर हिटसारखी स्थिती जाणवत होती. सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. यामुळे उष्म्यात आणखी वाढ झाली.

जिल्हाभर वातावरण ढगाळ आहे. समुद्र शांत असलातरी तेथेही ढगाळ स्थिती आहे. समुद्रात कुठेही बदल जाणवत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. सध्या चांगली थंडी पडत होती. आंबा काजू पिकासाठी ही पोषक स्थिती होती. यात अचानक झालेल्या बदलामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास किडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Web Title: sindhudurg atmosphere changes