सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचे ई-मेल अकौंट हॅक 

0
0

ओरोस : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचा executivedirector4182gmail.com हा ई-मेल आयडी हॅक करण्यात आला. त्यावरून खोटे मेल विविध कार्यालयांना पाठविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी दिली. 

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या नावे असलेल्या मेल आईडीवर executivedirector4182gmail.com या ई-मेल आयडीवरून खोटे मेल येत आहेत. हे मेल 23 सप्टेंबरला आले आहेत. जिल्हाधिकारी आपल्या ई-मेल आयडीवरून विविध कार्यालयात प्रशासकीय पत्रव्यवहार करीत असतात; मात्र याच ई-मेल आईडीवरून अलीकडे खोटे मेल आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात आल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या ई-मेलवर खोटे मेल आल्याच्या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने बाब गंभीर घेतली आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांचा सायबर सेल याकामी लागला आहे. 

खोट्या मेलवर विश्‍वास ठेवू नये 
जिल्हाधिकारी यांच्या मेलवरून खोटे ई-मेल आल्याने जिल्ह्यातील अन्य कार्यालयाना असे मेल येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे executivedirector4182gmail.com या ई-मेल आयडीवरून आलेल्या मेलवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. 

संपादन : विजय वेदपाठक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com