कोरोनाच्या बाधित दरानुसार सिंधुदुर्गचा चौथ्या स्तरात समावेश

कोरोनाच्या बाधित दरानुसार सिंधुदुर्गचा चौथ्या स्तरात समावेश
Summary

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) : ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्याने विविध जिल्ह्यातील कोरोनाच्या (Corona) बाधित दरानुसार पाच स्तर निश्चित केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील निकषानुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नवीन आदेश काढत १४ जूनपर्यंत परवानगी असलेली अत्यावश्यक सेवा दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. शनिवारी नव्याने आदेश काढत २१ जूनपर्यंत ही मुदत वाढविली आहे. (Sindhudurg district has been included in the fourth tier due to increasing corona)

कोरोनाच्या बाधित दरानुसार सिंधुदुर्गचा चौथ्या स्तरात समावेश
सिंधुदुर्ग सर्वप्रथम कोरोनामुक्त करा : मुख्यमंत्री ठाकरे

'ब्रेक दि चेन' अंतर्गत 'स्तर ४' चे निर्बंध जिल्ह्यात ७ जूनपासून हे आदेशापर्यंत लागू करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा स्तर चारमध्ये समाविष्ट असल्याने मार्गदर्शक तत्वानुसार सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ५ वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारची हालचाल, संचार करता येणार नाही. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने, आस्थापना - सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृहे - बंद राहतील. रेस्टॉरंट्स फक्त पार्सलसेवा, घेवून जाण्यासाठी आणि घरपोच सेवा सुरू राहतील.

कोरोनाच्या बाधित दरानुसार सिंधुदुर्गचा चौथ्या स्तरात समावेश
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटींचा मदतनिधी!

सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग-सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ वाजता ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील. खाजगी आस्थापना, कार्यालये यांना सुट देण्यात आलेली आहे. कार्यालयीन उपस्थिती, शासकीय कार्यालयेसहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) ही २५ टक्के उपस्थितीसह सुरू राहतील. खेळ - मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ वाजता ते सकाळी ९ वाजेपर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार बंद राहतील. हे आदेश २१ जूनपर्यंत कायम केले आहेत.

कोरोनाच्या बाधित दरानुसार सिंधुदुर्गचा चौथ्या स्तरात समावेश
Good News : साताऱ्यासह सिंधुदुर्ग, अलिबागमधील वैद्यकीय महाविद्यालयांना 8 कोटी मंजूर

धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम, मेळावे बंद राहतील. लग्नसमारंभ जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत, अंत्ययात्रा, अंतविध जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत, बैठका, निवडणूक-स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा ५० टक्के क्षमतेसह, बांधकाम-ज्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सोय असेल, अशी बांधकाम सुरू राहतील.

कोरोनाच्या बाधित दरानुसार सिंधुदुर्गचा चौथ्या स्तरात समावेश
हवामान विभागाचा इशारा; सिंधुदुर्ग किनाऱ्यावर 'या' तीन दिवसात मुसळधार पाऊस

लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश

कृषी व कृषी पूरक सेवा-सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ई-कॉमर्स-वस्तू व सेवा फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई-कॉमर्स सेवा सुरू राहतील. जमावबंदी, संचारबंदी - संचारबंदी, व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर-५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. या दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पूर्व नियोजित वेळ तसेच एसी सुरू न करण्याच्या अटीवर सुरू राहतील. या ठिकाणी केवळ लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील. (Sindhudurg district has been included in the fourth tier due to increasing corona)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com