सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा मुलगा अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

देवगड - येथे एसटी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात  राजरत्न बोरवडेकर (वय 19) हा जागीच ठार झाला. हा अपघात काल रात्री सव्वाआठच्या सुमारास देवगड सातपायरी परिसरात घडला. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांचा तो मुलगा आहे. 

मालवणहून विजयदुर्गला जाणाऱ्या एसटीची दुचाकीला धडक बसली. यात देवगड सहकारनगर येथील राजरत्न हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर शिंदे ,पोलीस नाईक राजन पाटील ,प्रशांत जाधव, दशरथ चव्हाण आदी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. देवगड आगार व्यवस्थापक डी.एम.चव्हाण विजयदुर्ग आगार व्यवस्थापक राजन भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

Web Title: Sindhudurg District Sports Officers son killed in an accident

टॅग्स