सिंधुदुर्ग मुख्यालयात तब्बल 51 उपोषणे 

Sindhudurg headquarters people fasts
Sindhudurg headquarters people fasts

ओरोस (सिंधुदुर्ग) - प्रजासत्ताकदिनी देशात एकीकडे आनंदोत्सव साजरा होत असताना जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीमध्ये न्याय मिळण्यासाठी तब्बल 51 उपोषणे झाली. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने उपोषणास नागरिक बसले होते. यातील 10 उपोषण जिल्हा परिषदसमोर तर उर्वरित 41 उपोषण जिल्ह्याधिकारी प्रवेशद्वारासमोर झाली. उपोषणकर्त्यांना बसण्यासाठी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जागा उपलब्ध नव्हती.

परिणामी एकमेकांना चिकटुन सर्वजण बसले होते. सर्व उपोषणकर्त्यांची भेट घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 
पालकमंत्री सामंत यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यावेळी जिल्ह्याधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आमदार वैभव नाईक, अतिरिक्त जिल्ह्याधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

उपोषणाला बसलेल्या व्यक्तीमध्ये वैयक्तिक प्रश्‍न, सार्वजनिक प्रश्‍न, मंदिर प्रश्‍न आदी विषय होते. पालकमंत्री सामंत यांनी प्रत्येक उपोषण ठिकाणी जात त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची मागणी समजावून घेत प्रशासनाला तत्काळ मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे काही उपोषणे तेथेच थांबली; मात्र काहींचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांची उपोषणे सुरुच राहिली. 

"ती' पद्धत बंद 
आमदार दीपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी पाच वर्षांत एक पद्धत सुरू केली होती. 26 जानेवारी, 15 ऑगस्टला उपोषण करण्याची नोटीस देणाऱ्या व्यक्ती, समूह किंवा संस्थांची आदल्या दिवशी बैठक आयोजित केली जात. त्यांचे प्रश्‍न सोडविले जातील, असे आश्‍वस्त करून उपोषण होवू नये यासाठी प्रयत्नरत होते. परिणामी अनेक उपोषणे होत नव्हती; मात्र पालकमंत्री सामंत यांनी ही पद्धत बंद केल्याची चर्चा आहे. 

अपेक्षांमुळेच उपोषणांची संख्या वाढली ः पालकमंत्री 

सिंधुदुर्गनगरी - लोकांच्या अपेक्षा वाढल्याने तसेच थेट भेटल्याशिवाय समस्या मार्गी लागत नाहीत, असा समज उपोषणकर्त्यांचा झाल्यानेच येथील उपोषणाची संख्या वाढली असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री सामंत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com