जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; घोटाळे उघड

वरिष्ठ स्तरावरून झालेल्या चौकशीअंती जिल्हा परिषदेत अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले
जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; घोटाळे उघड

सिंधुदुर्गनगरी : वरिष्ठ स्तरावरून झालेल्या चौकशीअंती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अनेक घोटाळे झाले आणि भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. या भ्रष्टाचारात प्रथमदर्शी दोषींमध्ये २०१२ ते आतापर्यंत म्हणजे गेल्या १० वर्षांत कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. याची सुरुवात महिला व बालविकास सभापतींच्या स्वीय्य सहायकाच्या निलंबनाने झाली आहे. त्यामुळे शिवसेना सदस्यांकडून जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत होत असलेले आरोप बिनबुडाचे नाहीत, हे स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब आणि प्रदीप नारकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; घोटाळे उघड
अधिवेशन सुरू होण्याआधीच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची धावपळ

यावेळी संजय पडते, राजेश कविटकर, नितीन शिरोडकर, अमरसेन सावंत, शिवसेना महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत उपस्थित होते. परब म्हणाले, 'जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला मनमानी कारभार, त्याला अधिकाऱ्यांचे असलेले सहकार्य, स्वनिधी घोटाळा, वॉटर प्युरिफायर घोटाळा, देवगड पंचायत समिती शिक्षण विभाग घोटाळा, एलईडी घोटाळा, महिला सदस्य अभ्यास दौरा आदींबाबत शिवसेना सदस्यांनी आवाज उठवत कोकण आयुक्त आणि शासनाकडे तक्रार केली होती. याबाबत वरिष्ठ स्तरावरून झालेल्या चौकशीअंती जिल्हा परिषदेत अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. भ्रष्टाचारात प्रथमदर्शी दोषींमध्ये २०१२ ते २०२० पर्यंत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.’

विकास नव्हे, केवळ घोटाळे

जिल्हा परिषदेचे सत्ताधारी मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केला जात आहे. विकास सोडून जिल्हा परिषदेत सर्वत्र घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे, असा आरोपही सदस्य नारकर यांनी केला.

जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; घोटाळे उघड
बिहारमध्ये भीषण स्फोट... पडलेल्या घराखालून काढले ७ मृतदेह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com