सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहा वेळा प्रावीण्य मिळविले आहे. यंदाच्या वर्षी तर जिल्ह्यातील १०९ शाळांचा १०० टक्‍के निकाल लागला. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील एम. पी. एस. सी, यु. पी. एस. सी सारख्या परीक्षांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करण्यात यईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.

दहावी, बारावी परीक्षेतील यशस्वी, गुणवंत विद्यार्थी, १०० टक्‍के निकाल लावणाऱ्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व संस्था चालकांचा गौरव सोहळ्यात पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते. 

यावेळी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, श्री. खोबरेकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. मातोंडकर, सचिव श्री. कुसगावकर, संस्था संचालक प्रतिनिधी आत्माराम राऊळ, दोडामार्ग पंचायत समितीचे सभापती श्री. नाईक आदी उपस्थित होते. शिक्षणावर राज्याच्या बजेटच्या २५ टक्‍के म्हणजे ४५ हजार कोटी रुपये खर्च करणारे महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, ‘‘शिक्षण संस्थांचा कारभार, आदर्श शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे कष्ट व जिल्ह्यांच्या समन्वयाने शिक्षण तंत्रात सिंधुदुर्ग अग्रेसर आहे. स्पर्धा परीक्षाबाबत कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवे आहे, या बाबत विद्यार्थी-शिक्षकांनी विधायक सूचना करण्याचे गरजेचे आहे.’’

यावेळी गुणवंत विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक यांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी दहावी परीक्षेत १०० टक्‍के गुण मिळविणाऱ्या बारा विद्यार्थी तसेच दहावी व बारावी परीक्षेत १०० टक्‍के निकाल लावणाऱ्या २७ शाळा तसेच दहावी परीक्षेत १०० टक्‍के निकाल लावणाऱ्या १०९ शाळांचा गौरव करण्यात आला. शिक्षणाधिकारी रंगराव काळे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. तन्वी संतोष कदम, रोहित गंगाराम कोकरे यांनी सत्काराला उत्तर देताना उच्च शिक्षणातही असेच यश कायम राखू अशी, ग्वाही दिली. अजय पाटील यांनी आभार मानले.

Web Title: sindhudurg konkan news competition exam guidance center