जिल्ह्यात पर्यटन, फळबाग लागवडीस वाव - पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - निसर्गसंपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व फळबाग लागवडीत वाव आहे. या दोन्ही योजनांच्या यशस्वीतेसाठी अधिकारी वर्गाने समन्वयाने कार्यरत राहण्याची आवश्‍यकता आहे, असे मत कोकण विभागीय आयुक्‍त जगदीश पाटील यांनी येथे आयोजित आढावा बैठकीत व्यक्‍त केले.

जिल्ह्यातील फळबाग लागवड, पर्यटन, खनिकर्म, भूसंपादन, जिल्हा नियोजन समिती आदी बाबत सविस्तर आढावा आयुक्‍त जगदीश पाटील यांनी सभेत घेतला. जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, नीता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात आदी उपस्थित होते. 

चौपदरी रस्त्यांतर्गत भूमिसंपादनाबाबत झालेली कार्यवाही, फळझाड अंतर्गत यापूर्वी झालेली फळझाड लागवड, यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट, खनिकर्म अंतर्गत रॉयल्टी वसुली, भूमिसंपादन लाभधारकांना मोबदला वितरण, पर्यटन प्रकल्पांची कार्यवाही आदींबाबत विभागीय आयुक्‍त श्री. पाटील यांनी आढावा 
घेतला.

Web Title: sindhudurg konkan news Tourism in the district, Horticulture cultivation scarcity