वादळी वाऱ्यामुळे 250 काजु झाडे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

आपण केलेल्या मेहनतीचे फळ मिळत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यांवर समाधान होते. सकाळी सहा वाजता बागेत जावुन काम करणे हा त्यांचा नित्यक्रमच होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता.18) सकाळी ते बागेत गेले आणि बागेची स्थिती पाहुन त्यांना रडू कोसळले. वादळी वाऱ्याने त्यांच्या बागेतील सुमारे अडीचशे झाडे भुईसपाट झाली आहेत. अवघ्या अर्ध्या तासात हा प्रकार घडला आहे.

वैभववाडी - काजु लागवड हेच त्यांचे लक्ष्य होते. दरवर्षी शंभर ते दीडशे काजुची लागवड ते करीत होते. लागवड केलेल्या रोपांची संख्या साडेपाचशे ते सहाशेवर पोहोचली. त्यातील काही झाडे गेल्या दोन वर्षापासुन उत्पन्न देखील देवु लागली. आपण केलेल्या मेहनतीचे फळ मिळत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यांवर समाधान होते. सकाळी सहा वाजता बागेत जावुन काम करणे हा त्यांचा नित्यक्रमच होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता.18) सकाळी ते बागेत गेले आणि बागेची स्थिती पाहुन त्यांना रडू कोसळले. वादळी वाऱ्याने त्यांच्या बागेतील सुमारे अडीचशे झाडे भुईसपाट झाली आहेत. अवघ्या अर्ध्या तासात हा प्रकार घडला आहे. रमेश परब असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

जिल्ह्यात गुरूवारी (ता.17) सायंकाळी झालेल्या वादळाचा सर्वाधिक तडाखा वैभववाडी तालुक्‍याला बसला. घरे, गोठे, याशिवाय वीज वितरण कंपनीसह विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीचा आकडा कोटीचा घरात पोहोचण्याची शक्‍यता आहे; परंतु काजु बागायतीचे फार मोठे नुकसान झाले आहे.

खांबाळे मधलीवाडी येथील रमेश अनाजी परब यांच्या बागेचे तर अतोनात नुकसान झाले आहे. श्री. परब यांनी कठोर मेहनतीने घरापासुन तीन किलोमीटर अतंरावर जंगलमय भागात साफसफाई करून सुमारे साडेपाचशे काजु रोपाची लागवड केली होती. सुरूवातीला लागवड केलेल्या रोपांपासुन त्यांना उत्पन्न देखील मिळणे सुरू झाले होते; परंतु गुरूवारी झालेल्या वादळाने त्यांच्या बागेतील सुमारे अडीचशे रोपे भुईसपाट झाली आहेत. बागेची ही अवस्था पाहुन श्री. परब यांना रडू कोसळले. त्यांचे सुमारे पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. कष्टाने उभी केलेली आणि हातातोंडाशी आलेली बाग नेस्तनाबुत झाल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. या नुकसानीचा कृषी विभागाने पंचनामा केला आहे.

नुकसान भरपाई देण्याची तरतुद नाही
घर, गोठा कोसळला तर शासनाच्यावतीने नुकसान भरपाई दिली जाते; मात्र काजु, आंबा किंवा अन्य झाडांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई देण्याची तरतुद नाही. त्यामुळे या वादळाने झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसानभरपारई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत.
 

Web Title: Sindhudurg News 250 cashew nut trees damaged