मालवण मार्गावर भोगलेवाडीजवळ एसटी-दुचाकी अपघातात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

मालवण - बेळणे बागायत मालवण मार्गावरील बागायत भोगलेवाडी येथे एसटी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश सदानंद बोडेकर (वय 24 रा. हरकुळ खुर्द) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडे चार वाजण्याच्या दरम्यान घडली.

अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला रवींद्र नागेंद्र बोडेकर हा गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

आज पहाटे आंगणेवाडी यात्रा आटोपून मंगेश सदानंद बोडेकर व रवींद्र नागेंद्र बोडेकेर हे आपल्या दुचाकीने कणकवलीच्या दिशेने जात होते. यावेळी कुडाळ आंगणेवाडी ही जादा एसटी बसफेरी आंगणेवाडीच्या दिशेने येत होती. बेळणे बागायत भोगलेवाडी चढावाच्या रस्त्यावर एसटी व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसली. यात अपघातात दुचाकीस्वार मंगेश बोडेकर हा जागीच ठार झाला. त्याच्यामागे बसलेला चुलत भाऊ रवींद्र बोडेकर हा गंभीर जखमी झाला. जखमी बोडेकर याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मंगेश बोडकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अधिक तपास पोलिस करत आहेत. 

Web Title: Sindhudurg News accident on Malvan Rout near Bhogalewadi