सिंधुदुर्गात बेशिस्त वाहनचालकांविरूध्दच्या कारवाईत वाढ

भूषण आरोसकर
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सावंतवाडी - जिल्ह्यात वर्षभरात जिल्हा वाहतुक शाखेमार्फत वाहनचालकांवर केलेल्या कारवाईत वाढ झाली आहे. 19 हजार 270 वाहनचालकांवर 45 लाख 23 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

सावंतवाडी - जिल्ह्यात वर्षभरात जिल्हा वाहतुक शाखेमार्फत वाहनचालकांवर केलेल्या कारवाईत वाढ झाली आहे. 19 हजार 270 वाहनचालकांवर 45 लाख 23 हजार 700 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

2016 च्या तुलनेत तिप्पट दंड आकारणी झाली असून अपघातात मृत्युमूखी पडणाऱ्याचा संख्येतही घट करण्यास जिल्हा वाहतूक शाखेला यश आले आहे. दंड आकरणीच्या वाढीचा शासनाच्या महसुलाला याचा मोठा फायदा झाला आहे.
आधुनिक युगात वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे अपघात व मृत्यूमुखी पडणाऱ्याच्या संख्या वाढण्याच्या शक्‍यताही मोठ्या प्रमाणात बळकावल्या आहेत. अशात जिल्हा वाहतूक शाखेने धडक कारवाई करत अपघाताचे प्रमाण कमी करण्यास यश मिळविले आहे. अपघात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत कमतरता आणून ही मोहिम अधिक धडक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सहा वर्षातील आकडेवारी

  • वर्ष..........केसेस.......दंड

  • 2012.......11392.....1254900

  • 2013........19480.....2414000

  • 2014........20293......2312902

  • 2015.........15606......2235600

  • 2016........10727........1493925

  • 2017........19270.......4523700

जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 2016 पेक्षाही तब्बल तिपट्ट जास्त दंड आकरण्यात यश मिळविले आहे. यामागे दंडात झालेली वाढही तेवढीच कारणीभूत ठरली आहे. कर्मचारी संख्याही वाढली असल्यामुळे हा फायदा झाला आहे. दंड आकारणीत झालेली वाढ लक्षात घेता वाहतुकीचे नियम तोडण्याचे धाडस करताना नागरीक वर्ग आता धजावू लागले आहेत. दंडात्मत कारवाईचा असलेला अनुभवामुळे पुन्हा वाहतूकीचे नियम न तोडणारे नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा फायदा शासनालाही जास्त महसुल मिळू लागला आहे.

वाहतुकीच्या बाबतीत आज लोकांनी शिस्त पाळणे आवश्‍यक आहे. दंडात झालेली वाढीवरून लोकांनीच आपल्याला काय तो "रिझल्ट' दिलेला आहे. नागरीकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. वाहन पुर्ण तांत्रिक क्षमतेचे रस्त्यावर चालवावे. हेल्मेट, सीटबेल्ट सारख्या बेसिक गोष्टींचा वापर शक्‍यतो करावा. सुरक्षितता पाळल्यास याहीपेक्षा मृतांच्या संख्येत घट होवू शकते.''
- दीक्षितकुमार गेडाम,
पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग

2017 वर्षात तब्बल 19 हजार 270 एवढ्या प्रमाणात वाहनचालकांवर कारवाई करुन 45 लाख 23 हजार रुपयांचा दंड आकारला गेला आहे. जिल्ह्यात 2016 मध्ये 80 लोकांना आपला प्राण अपघातात गमवावा लागला होता. वर्षभरात झालेल्या अपघाताचे हे प्रमाण छोट्या जिल्ह्याच्या तुलनेत मोठे समजले जात आहे. 2017 चा विचार करता यात 20 टक्‍याने घट करण्यात जिल्हा वाहतूक शाखेला यश आले आहे. 2017 मध्ये 60 लोकानी आपला जीव अपघातात गमावला आहे. 21 ते 23 लोकांचे प्राण हे हायवे अपघातात गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर झालेल्या अपघातात 9 लोकांना डंपर व इतर मोठ्या वाहनांतून झालेल्या अपघाताने मृत्यूस सामोरे जावे लागले आहे.

आंगणेवाडी यात्रेवेळी डंपर वाहतुक बंद
अंगणवाडी यात्रेदिवसासाठी दोन दिवस डंपर वाहतुक बंद ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षकांमार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहोत. यात्रेसाठी दोन दिवस वाहनाचे प्रमाण लक्षात घेता अपघात होण्याची शक्‍यता असते. यासाठी हा निर्णय घेणार असल्याचे यावेळी जिल्हा जिल्हा वाहतुकिचे प्रभारी पोलिस अधिकारी शहाजवान मुल्ला यांनी सांगितले.

जिल्ह्यात सप्टेंबर 2016 पासून दंड आकारणीत वाढ झाली आहे. विना वाहतूक परवानासाठी पुर्वी 200 आता 500, सीटबेल्ट नसल्यास पूर्वी 100 आता 200, काळ्या काचा लावल्यास पुर्वी 100 आता 500 हेल्मेट नसल्यास 100 ऐवजी आता 500 इतर काही वाहतुक नियम तोडल्यासही दंड आकारणीत वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा हे नियम तोडणाऱ्याच्या संख्येत बरीच घट झाली आहे. जिल्हा वाहतूक शाखेमार्फत केलेली ही कारवाई पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी पोलिस अधिकारी प्रकाश शहानवाज मुल्ला यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली.

यावर्षी ड्रंक ऍण्ड ड्राईंव्ह अर्तंगत दंड आकारणी
जिल्ह्यात ब्रेथ ऍनालायझ मशिन 11 ही पोलिस ठाण्यात दिली आहेत; मात्र त्याचा पुरेपूर वापर होताना दिसून येत नाही. ड्रंक ऍण्ड ड्राईंव्ह अंतर्गंत ही 2017 च्या वर्षभरात 139 जणांवर 3 लाख 14 हजार 200 एवढा दंड आकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील असलेल्या काही महत्वाच्या चेकपोस्टवर ब्रेथ ऍनालायझर मशिनची उपलब्धता झाल्यास या कारवाई अंतर्गंत संख्येत वाढ होवू शकते. 

Web Title: Sindhudurg News action against Uncertainty driver