नारायण राणे यांची भूमिका अपेक्षितच - ॲड. राजीव साबळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

सावंतवाडी - स्वाभिमान शिवसेनेला मदत करणार नाही हे गृहीतच आहे. राष्ट्रवादीला पाठिंब्याबद्दल राणेंची भूमिका अपेक्षितच होती. आम्हाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार ॲड. राजीव साबळे यांनी येथे व्यक्त केली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार ॲड. साबळे यांच्या प्रचारार्थ येथील विधानसभा मतदारांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. यांच्या समवेत शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत उपस्थित होते. त्यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोकणात शिवसेनाच विधानपरिषदेची जागा जिंकणारच. ९४० पैकी ५०० मतदार मतदान करणार, असा विश्‍वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला. पालकमंत्री दीपक केसरकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते.

श्रीधर अपार्टमेंटमध्ये झालेल्या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, नगरसेवक बाबू कुडतरकर, भारती मोरे, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळा दळवी आदींसह तिन्ही तालुक्‍यातील नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Ad Rajiv Sable comment