आडाळी एमआयडीसीचा आराखडा सादर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

आडाळी - येथील नियोजीत एमआयडीसीचा आराखडा अंतिम मंजूरीसाठी पाठवल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पंचायत समिती सदस्य धनश्री गवस यांना दिली. सौ. गवस यांनी हा प्रश्‍न उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे मांडला होता. 

आडाळी - येथील नियोजीत एमआयडीसीचा आराखडा अंतिम मंजूरीसाठी पाठवल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पंचायत समिती सदस्य धनश्री गवस यांना दिली. सौ. गवस यांनी हा प्रश्‍न उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे मांडला होता. 

आडाळी येथे एमआयडीसी प्रस्तावित आहे. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिली होती. ग्रामस्थांनीही भूसंपादनाला सहकार्य केले होते. त्यामुळे जवळपास 90 टक्‍केपेक्षा जास्त भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर सत्तांतर झाले. गेली तीन वर्षे या प्रकल्पासाठीच्या हालचाली थंडावल्या होत्या.

"सकाळ'ने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिध्द करून हा प्रश्‍न मांडला होता. याची दखल घेत या भागातील पंचायत समिती सदस्या गवस यांनी उद्योगमंत्री देसाई यांचे निवेदनाव्दारे लक्ष वेधले. हा प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. श्री. देसाई यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईत लवकरच बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. 

उद्योगमंत्री देसाई यांनी याबाबत एमआयडीसीला आवश्‍यक पाठपुराव्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्‍वभूमिवर रत्नागिरी प्रादेशिक अधिकारी कार्यालयाने सौ. गवस यांना पत्र पाठविले आहे. यात म्हटले आहे की, आडाळीतील भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 265 हेक्‍टर आर क्षेत्राची खरेदी खते पूर्ण झाली असून, उर्वरीत क्षेत्राबाबत भूसंपादन कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. नियोजित औद्योगिक क्षेत्राचा आराखडा मंजूरीसाठी एमआयडीसीच्या मुख्यालयात सादर केला आहे. 

दृष्टीक्षेपात एमआयडीसी 

  • प्रकल्पासाठीच्या हालचाली : जानेवारी 2012 
  • प्रकल्पासाठीची दरनिश्‍चिती : डिसेंबर 2013 
  • प्रकल्पासाठी अधिसूचित जागा : 288 हेक्‍टर 
  • आतापर्यंत जमीन खरेदी झालेली जागा : 265 हेक्‍टर 
Web Title: Sindhudurg News Adali MIDC layout send for sanction