अंगणवाडी सेविकांचा कणकवलीत जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

कणकवली - अंगणवाडी सेविकांचा मागण्या शासनाने मान्य केल्या. त्यानंतर आज तालुक्‍यातील अंगणवाडी सेविकांनी शहरातील शिवाजी चौक येथे एकत्र येऊन जल्लोष केला. 

कणकवली - अंगणवाडी सेविकांचा मागण्या शासनाने मान्य केल्या. त्यानंतर आज तालुक्‍यातील अंगणवाडी सेविकांनी शहरातील शिवाजी चौक येथे एकत्र येऊन जल्लोष केला. 

‘अंगणवाडी नेत्या कमलताई आगे बढो..’ अशा घोषणाही देण्यात आल्या. राज्यातील अंगणवाडी सेविकांना आता सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन दिले जाणार आहे. १ ऑक्‍टोबरपासून ही वाढ असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. 

दरम्यान, राज्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका २६ दिवस संपावर होत्या. या मोठ्या आंदोलनाला यश मिळाल्यामुळे तालुक्‍यातील अंगणवाडी सेविकांना एकत्र येऊन शिवाजी चौक येथे जल्लोष केला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभा युनियन पणदूरच्या तालुका प्रमुख स्नेहलता सावंत, दर्शना उपरकर, स्वाती पोयेकर, शोभा कारेकर, आशा  घाडी, राजश्री भोकरे आदी उपस्थित होत्या.

Web Title: sindhudurg news Aganwadi Employee enjoy in Kankavali