कणकवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

तुषार सावंत
शुक्रवार, 25 मे 2018

कणकवली - इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेने येथे आज रास्ता रोको केला. अवघ्या सात मिनिटात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून महामार्ग सुरळीत केला. मोजक्याच कार्यकर्त्याना घेवून आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. खरे  मात्र पोलिसांनी या आंदोलनाची धार बोथड करून टाकली. 

कणकवली - इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेने येथे आज रास्ता रोको केला. अवघ्या सात मिनिटात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून महामार्ग सुरळीत केला. मोजक्याच कार्यकर्त्याना घेवून आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

गेले काही महिने स्वयंपाक गॅससह इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घराचे बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीबरोबरच भाज्यांचे दरही वाढले आहेत. जनमानसातील हा संताप सोशल मिडियामधून व्यक्त होत आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधक हे चिडीचूप आहेत. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपची साथ न मिळाल्याने शिवसेनेला पराभव स्विकारावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याचे ठरविले. 

इंधन दरवाढी विरोधात रास्ता रोको करण्यासाठी येथील शिवसेना कार्यालयाजवळ मोजकेच कार्यकर्ते गोळा झाले. आमदार नाईक यांनी महार्गावरून घोषणा देत मुख्य चौक गाठला. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे, तालुकाध्यक्ष सचिन सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू राणे, राजू राठोड, सुजीत जाधव, भूषण परुळेकर, नगरसेविका मानसी मुंज, माही परूळेकर, आनंद आचरेकर, प्रमोद मसुरकर, राजू शेटये, भालचंद्र दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Sindhudurg News agitation against hike in Petrol Price