करवाढीच्या विरोधात सावंतवाडीत आंदोलन

अमोल टेंबकर
बुधवार, 7 मार्च 2018

सावंतवाडी - घरपट्टीच्या रकमेत करण्यात आलेली पाच पट वाढ ही सर्वसामान्य लोकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने पुर्नविचार  करावा या मागणीसाठी आज नागरिकांनी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले. तसेच आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. 

सावंतवाडी - घरपट्टीच्या रकमेत करण्यात आलेली पाच पट वाढ ही सर्वसामान्य लोकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने पुर्नविचार  करावा या मागणीसाठी आज नागरिकांनी नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले. तसेच आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. 

नगरपरिषदेकडुन आकारल्या जाणार्‍या घरपट्टी व मालमत्ता करात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. या प्रकीयेचा निषेध करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख शब्बीर मणीयार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे शहर प्रमुख सुधीर आडीवरेकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, सत्यजित धारणकर, बाबल्या दुभाषी, सिध्देश पुरलकर सहभागी झाले होते.

चुकीच्या पध्दतीने घरपट्टी तसेच मालमत्ता करात वाढ केली आहे. यामध्ये नागरिकांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही. हरकती घेतल्या होत्या मात्र त्याचा प्राधान्याने विचार करण्यात आलेला नाही. परिणामी आता नव्या अध्यादेशानुसार आकारण्यात आलेली घरपट्टी पाच पट वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांनी एवढी रक्कम करापोटी भरणे परवडणारे नाही असे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. 

यावेळी अमित परब, संजय पेडणेकर, विनोद सावंत, गजा कुडपकर, राजू पनवेलकर, संतोष मठकर, शेखर धारगळकर, परशुराम पावसकर, रावजी परब, प्रसाद अरंविदेकर, साई कोरगावकर, सुधीर सावंत, राकेश बांदेकर,उल्हास कोरगावकर, किरण राऊळ, विजय मेजारी, सूधीर धूमे. रमेश मडव, राजाराम गावडे हे उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News agitation against hike in tax