आंगणेवाडी जत्रोत्सवातून सिंधुदुर्ग एसटीला २७ लाख उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

कणकवली - आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग एसटी विभागाला २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ३ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले. यावर्षी १९४५ फेऱ्यांच्या माध्यमातून ५९ हजार प्रवाशांची वाहतूक केली. 

कणकवली - आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग एसटी विभागाला २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ३ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले. यावर्षी १९४५ फेऱ्यांच्या माध्यमातून ५९ हजार प्रवाशांची वाहतूक केली. 

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी यावर्षी  २६ ते २८ जानेवारी या कालावधीत जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात केलेली होती. यात मालवण आगारातून ८२७ फेऱ्या सोडण्यात आल्या. यातून १८०४३ प्रवाशांची वाहतूक केली. त्यातून आगाराला ७ लाख ९६ हजार २४४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. कणकवली आगारातून ४६८ फेऱ्यांच्या माध्यमातून १५६१८ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. यातून ८ लाख ११ हजार १७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले. देवगड आगारातून या यात्रोत्सवासाठी १४५ फेऱ्या सोडण्यात आल्या त्यातून ५६६० प्रवाशांची वाहतूक केली. त्यातून या आगाराला १ लाख ७९ हजार २२३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. विजयदुर्ग आगारातून ६६ फेऱ्या सोडण्यात आल्या. यातून २६१० प्रवाशांची वाहतूक करून १ लाख २ हजार ८३४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

कुडाळ आगारातून ४१७ फेऱ्यांच्या माध्यमातून १५५५० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. त्यातून या आगाराला ७ लाख ६३ हजार ७८६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. वेंगुर्ले आगारातून २२ फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यातून १७२० प्रवाशांची वाहतूक करून ५१ हजार ५४२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. सिंधुदुर्ग विभागाला यावर्षी एकूण २७ लाख ४ हजार ८०७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी १८३३ गाड्यांच्या माध्यमातून ५३९८६ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली होती व २३ लाख ९३ हजार ६९० उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीपेक्षा यंदा ३ लाख ११ हजार ११७ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Web Title: Sindhudurg News Anganewadi Jatra 27 lakh Profit to ST